टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Maharashtra Board 10th Result 2026 Declared : दहावीचा निकाल जाहीर, कोणता विभाग अव्वल, कोणता मागे?

On: May 8, 2026 11:39 AM
Follow Us:

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून ९७.६२ टक्क्यांसह कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Maharashtra Board 10th Result 2026 Declared : दहावीचा निकाल जाहीर, कोणता विभाग अव्वल, कोणता मागे?

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच वर्चस्व राखले आहे. राज्यातील एकूण १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १०वीचा निकाल विद्यार्थ्यांना सकाळी ११.३० वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे, १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल असं आधी बोर्डाकडून सांगण्यात आलं होतं, मात्र, अचानक वेबसाईटवरती वाढणारे ट्रॅफिक यामुळे सकाळी ११.३० वाजल्यापासून निकाल पाहता येणार असल्याचा बोर्डाचा महत्वाचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे.

परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय ठरला फायदेशीर

विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने यंदा दहावीची परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस लवकर घेण्यात आली होती. एकूण ६४ विविध विषयांमध्ये ही परीक्षा पार पडली. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात परीक्षा अत्यंत निकोप आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे, ६४ पैकी २० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

SSC Exam Result 2026:  दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींची बाजी

मुलींची टक्केवारी ९४.९६ टक्के

मुलांची टक्केवारी: ९०.५६ टक्के

मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांची ९०.५६ टक्केवारी

विभागावार निकाल

निकालाच्या आकडेवारीनुसार, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.९६ टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण ८९.५६ टक्के इतके आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ५.४० टक्क्यांनी अधिक लागला आहे. तर विभागावार निकालात कोकण विभागाने ९७.६२ टक्क्यांसह राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर (८८.४१ टक्के) विभागाचा लागला आहे.

क्र. विभागीय मंडळाचे नाव निकालाची टक्केवारी
कोकण ९७.६२%
कोल्हापूर ९५.४७%
मुंबई ९४.९७%
पुणे ९४.२४%
नाशिक ९०.९३%
अमरावती ९०.५०%
नागपूर ८९.०७%
लातूर ८८.४२%
छत्रपती संभाजीनगर ८८.४१%
राज्याचा एकूण निकाल ९२.०९%

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

आश्रमशाळेतील तीन विद्यार्थींनीचा मृत्यू, महाराष्ट्रातील हादरवून सोडणारी घटना

महायुतीत पुन्हा धुसफूस ? शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळेच आज भाजप सत्तेत, त्या पोस्टने सगळंच बाहेर आलं

खरी शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी रंजक वळणावर, आज काय घडणार?

शिंदेंकडे असलेलं धनुष्यबाणाचं चिन्ह गोठवणार का? आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार