टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

LIVE! रोहित शर्माने जिंकला टॉस

On: October 30, 2022 10:50 AM
Follow Us:

T20 विश्वचषकमध्ये भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत आहे. या स्पर्धेतील हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात कठीण सामना असू शकतो. पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर टीम इंडियाच्या फलंदाजांसमोर आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांचे आव्हान असेल. या स्पर्धेत भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत केल्यानंतर भारताचे ४ गुण झाले असून हा संघ गुणतालिकेत अव्वल आहे आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात टीम इंडिया एका बदलासह उतरली आहे. या सामन्यात दीपक हुडाला संधी देण्यात आली आहे. तर अक्षर पटेल आजचा सामना खेळणार नाही.
पाकिस्तानच्या संघाने पहिले दोन सामने गमावले असून त्यांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी आता नशिबाची साथ लागणार आहे. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करावा, अशी प्रार्थना पाकिस्तान संघ करेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now