KCC : किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेची मर्यादा वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात केली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना किसान क्रेडिट कार्डवरुन दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सुरु करण्यात आलं आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये किसान क्रेडिट कार्डवरुन होणाऱ्या वित्तपुरवठ्यामध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भतील माहिती समोर आली आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये सुरु करण्यात आली होती. वेळोवेळी या योजनेत बदल करण्यात आले आहेत. आता निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात कर्जमर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती. आता केसीसी मिळणारं कर्ज 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आलं आहे.

किसान क्रेडिट कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देशभरात 7 कोटी 72 लाखांपेक्षा अधिक आहे. या शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षात होणाऱ्या वित्त पुरवठ्यात वाढ झाली आहे. मार्च 2014 मध्ये केसीसीवर  4.26 लाख कोटींच्या कर्जाचं वाटप करण्यात आलं होतं. तर,  डिसेंबर  2024 पर्यंत ही रक्कम 10.05 लाख कोटींवर पोहोचली आहे.

किसान क्रेडिट कार्डवरुन शेतकर्‍यांना शेतीसाठी किफायतशीर व्याज दरात भांडवल उपलब्ध होतं. शेती आणि शेतीशी संबंधित गोष्टींसाठी  वित्तपुरवठा किसान क्रेडिट कार्डवरुन केला जातो.

किसान क्रेडिट कार्ड द्वारे बँकांकडून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदरानं वित्त पुरवठा केला जातो. यामध्ये बियाणं खरेदी, औषध खरेदी याच्यासह पिकाच्या काढणीवेळी लागणारं भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. 2019 मध्ये किसान क्रेडिट कार्डच्या कक्षेत केंद्र सरकारनं डेअरी आणि मत्स्य उद्योगाचा समावेश करण्यात आला.

आतापर्यंत शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्डवरुन 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 7 टक्क्यांनी दिलं जायचं. आता याची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत कर्ज परतफेड केल्यास 3 टक्के व्याज माफ केलं जातं. म्हणजेच शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के व्याजानं पैसे उपलब्ध होतात.

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवरुन जुन्या नियमांप्रमाणं 1.60 लाख रुपयांपर्यंतची रक्कम विनातारण दिलं जातं. शेतकऱ्यांना कमी त्रासात वित्त पुरवठा उपलब्ध होण्यासाठी केसीसी फायदेशीर ठरणार आहे.  केंद्र सरकारनं 2025-26 मध्ये कृषी क्षेत्रासाठी  127290  कोटींची तरतूद केली आहे.

दरम्यान, किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाच्या मर्यादेत जी वाढ करण्यात आली आहे त्याचा फायदा यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि योग्य वेळेत परतफेड केली, अशांना फायदा होईल. किसान क्रेडिट कार्डच्या एकूण सदस्यांच्या 10 टक्के म्हणजेच जवळपास 80 लाख सदस्यांना 5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल.

इतर बातम्या : 

Champions Trophy 2025 : एक मॅच रद्द झाल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी अजून रोमांचक, सेमीफायनलच गणित बदललं

शरद पवारांची साथ सोडण्याची चर्चा, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी 25 मिनिटं हितगुज, जयंत पाटील यांनी अखेर सोडलं मौन

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon