टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

कल्याणमध्ये 22.50 कोटींची जमीन फसवणूक? शेतकऱ्यांची डेव्हलपर्सविरोधात तक्रार

On: September 29, 2026 11:09 AM
Follow Us:

कल्याण पश्चिमेतील गांधारी गावात पाच शेतकरी कुटुंबांच्या 111 गुंठे जमिनीच्या विकास व्यवहारातून तब्बल 22 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीनंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात विकासकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2011 मध्ये शेतकरी कुटुंबांनी आपली 111 गुंठे जमीन विकासासाठी रॉईस डेव्हलपर्सकडे दिली होती. करारानुसार जमीनमालकांना मंजूर बांधकाम क्षेत्रातील 50 टक्के हिस्सा तसेच TDR मधील 30 टक्के विक्रीयोग्य बांधकाम देण्याचे ठरले होते. यामध्ये सदनिका, दुकानांचे गाळे आणि ऑफिस गाळ्यांचा समावेश होता.

या जमिनीवर 2012 पासून बांधकाम सुरू झाले आणि 2022 पर्यंत सात इमारती उभारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र करारानुसार शेतकऱ्यांना मिळणारा मालमत्तेचा हिस्सा पूर्णपणे देण्यात आला नसल्याचा आरोप आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना वाटपपत्र देण्यात आलेल्या काही सदनिका त्यांच्या परवानगीशिवाय विकण्यात आल्या. काही गाळे बँकेकडे तारण ठेवून कर्ज घेण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पार्किंग आणि ओपन पार्किंगच्या जागेबाबतही व्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याशिवाय, बांधकाम सुरू असताना शेतकऱ्यांना देण्याचे ठरलेले भाडे मिळाले नसल्याचेही सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे तयार करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या सर्व प्रकारामुळे सुमारे 22 कोटी 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांनी याबाबत ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. चौकशीनंतर खडकपाडा पोलिसांनी रॉईस डेव्हलपर्सचे संजय शांताराम कणकोशे, गीता राकेश पटेल आणि मीत राकेश पटेल यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 338, 340 आणि 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, नुकसानभरपाई मिळावी, संबंधितांवर कारवाई करावी आणि इतर विकास करारही रद्द करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी कुटुंबीयांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

३०८ चाकांचा ‘महाबली’ ट्रक अजूनही अडकला; सहा महिन्यांनंतरही मंजिल दूर?

पुढचे 24 तास धोक्याचे? 24 राज्यांना पावसाचा इशारा, महाराष्ट्रातील 8 जिल्हे अलर्टवर

महिला शेतकऱ्यांसाठी दिल्लीत अखिल भारतीय परिषद; 30 सप्टेंबरला आयोजन, 28 सप्टेंबरला पत्रकार परिषद

गणपती बाप्पा मोरया! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात; भाविकांची मोठी गर्दी

सापांच्या प्रजनन हंगामाला सुरुवात; चंदनाच्या झाडाजवळ वावरताना सावध राहण्याचा सल्ला

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील मुंबईत गणपती विसर्जनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; 24 हजारांहून अधिक कर्मचारी तैनातलोकप्रिय ‘रसरंग दांडिया’ महोत्सव रद्द