टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

‘झुकेगा नहीं साला…’, ‘धुरंधर’चा 500 कोटींच्या फिल्मला धोबीपछाड, बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई

Follow Us:

Avatar Box Office Collection Day 4: ‘अवतार’ फ्रँचायझीमधील ‘अवतार: फायर अँड अ‍ॅशेस’ हा तिसरा सिनेमा आहे. पहिले दोन भाग भारतात प्रचंड हिट झाले होते आणि तिसरा भाग चांगला नफा कमावतोय.

Avatar Box Office Collection Day 4: जेम्स कॅमेरूनचा (James Cameron) ‘अवतार: फायर अँड अ‍ॅशेस’ (Avatar: Fire and Ash) हा चित्रपट गेल्या आठवड्यात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि तो चांगली कमाई करतोय. सध्याचा ब्लॉकबस्टर सिनेमा (Blockbuster Cinema) ‘धुरंधर’ला (Dhurandhar)  जोरदार टक्कर देत असला तरी, ‘अवतार: फायर अँड अ‍ॅशेस’ तशी फारशी कमाई करू शकलेला नाही. ‘अवतार: फायर अँड अ‍ॅशेस’नं आठवड्याच्या शेवटी चांगली कमाई केली आहे. पण, सोमवारी 500 कोटींच्या ‘अवतार: फायर अँड अ‍ॅशेस’ची कमाई लक्षणीयरीत्या घटल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी ‘अवतार’ ब्लॉकबस्टरपेक्षा खूपच मागे पडला. ‘अवतार: फायर अँड अ‍ॅशेस’चं कलेक्शन जाणून घेऊयात…

‘अवतार’ फ्रँचायझीमधील ‘अवतार: फायर अँड अ‍ॅशेस’ हा तिसरा सिनेमा आहे. पहिले दोन भाग भारतात प्रचंड हिट झाले होते आणि तिसरा भाग चांगला नफा कमावतोय. सिनेमाला 100 कोटी क्लबमध्ये सामील होण्यास थोडा वेळ लागेल, कारण आठवड्याच्या शेवटी सिनेमाच्या कमाईत मोठी घट झालीय.

सोमवारी कमाईत मोठी घट

‘अवतार: फायर अँड अ‍ॅशेस’च्या कमाईत सोमवारी मोठी घट झाली. निर्मात्यांनाही एवढी घसरण अपेक्षित नव्हती. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘अवतार: फायर अँड अ‍ॅशेस’नं सोमवारी फक्त 8.50 कोटी कमावले, जे इतर दिवसांपेक्षा खूपच कमी आहे.

चित्रपटानं पहिल्या दिवशी 19 कोटी, दुसऱ्या दिवशी 22.5 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 25.75 कोटी कमावले. एकूण कलेक्शन आता 75.75 कोटींवर पोहोचलं आहे. जर चित्रपटाची कमाई अशीच सुरू राहिली तर चित्रपटाला 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यास थोडा वेळ लागेल.

‘अवतार’ला ‘धुरंधर’कडून धोबीपछाड

सोमवारी ‘अवतार’नं फक्त 8.50 कोटी कमावले, तर ‘धुरंधर’नं ती रक्कम दुप्पट केली आहे आणि  16.5 कोटी कमावले आहेत. जरी कलेक्शनमध्ये लक्षणीय घट झाली असली तरी, ते ‘अवतार’पेक्षा खूप पुढे असल्याचं दिसून येतंय. ‘धुरंधर’नं आधीच एकट्या भारतात 572 कोटी कमावले आहेत आणि अनेक विक्रम मोडले आहेत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

कुणाला 5 , तर कुणाला शून्य मते… महाविकास आघाडीचा सर्वात वाईट पराभव; 17 पैकी 17 जागांचा निकाल एका क्लिकवर

Nashik Vidhan Parishad : नाशिक विधानपरिषदेचा धक्कादायक निकाल, महायुतीचा उमेदवार पडला, गोकुळ गिते विजयी, पहिल्याच फेरीत खेळ संपवला

परभणीतील यशवाडीत मोठी दुर्घटना: हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 7 भाविकांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी; VIDEO

Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल, धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

तुपकरांच्या आंदोलनाचा मुंबईत भडका, भरसमुद्रात जलसमाधी आंदोलन, मोठा थरार, पोलिसांची दमछाक

Horoscope Today 16th June 2026 : व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये रहा सावध, मुलांच्या लग्नाची समस्या आज सुटणार, कोणाला मिळणार गुड न्यूज? .. वाचा तुमचं भविष्य !