Jasprit Bumrah : IPL पूर्वी मोठी अपडेट, मुंबई इंडियन्सला बसणार झटका बसणार ?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

टीम इंडियाचा वेगवान स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहॅबसाठी गेला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. लवकरच सुरू होणाऱ्या आयपीएलपूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे.

टीम इंडियाचा वेगवान स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. आता तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार असल्याची चर्चा आहे. नुकताच तो प्रॅक्टिस करतानाही दिसला होता. पण बुमराहच्या फिटनेसबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या टीमला मोठा धक्का बसू शकतो.

जसप्रीत बुमराहबद्दल मोठी अपेडट काय ?

एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह हा आयपीएल 2025 च्या सुरुवातीला खेळताना दिसणार नाही. बुमराह सध्या बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन करत आहे. पण तो आयपीएल 2025 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत बाहेर राहू शकतो. म्हणजेच तो गोलंदाजीसाठी अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. तो एप्रिलमध्येच मुंबई इंडियन्सच्या संघात सहभागी होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘बुमराहचा वैद्यकीय अहवाल ठीक आहे. त्याने सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजी सुरू केली आहे. मात्र, आयपीएलच्या सुरुवातीला तो गोलंदाजी करू शकेल, अशी शक्यता कमी आहे. सद्यस्थितीनुसार एप्रिलचा पहिला आठवडा हा त्याच्या परतीसाठी उत्तम काळ आहे. मेडिकल टीम हळूहळू त्याचा वर्कलोड वाढवेल. जोपर्यंत बुमराह हा पूर्ण वेगाने गोलंदाजी करू शकत नाही, तोपर्यंत मेडिकल टीमकडून त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता नाही’ असे समजते.

किती मॅच मिस करणार बुमराह ?

जर बुमराह एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात खेळण्यासाठी परतला तर तो मुंबई इंडियन्सचे 3 ते 4 सामने गमावू शकतो. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव देखील हंगामाच्या सुरुवातीला संघात सहभागी होऊ शकणार नाही. रिपोर्टनुसार, मयंक यादव देखील एप्रिलमध्ये आयपीएलमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

 

हे सुद्धा वाचा

संत्र्याचं फळ खाल्ल्यानंतर साली फेकून देताय? तर हा लेख एकदा नक्की वाचा!

वायुसेनेचे जग्वार लढाऊ विमान कोसळले

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon