टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

भारतासाठी अत्यंत मोठी गुड न्यूज, संकटात भारताच्या मदतीला धावून आला इराण

इराण आणि अमेरिका युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा झाला. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. आता भारतासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी येताना दिसत आहे.

संकटात भारताच्या मदतीला धावून आला इराण, भारतासाठी अत्यंत मोठी गुड न्यूज, थेट होर्मुज खाडीतून..

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसला. आखाती देशांची तर वाट लागली. यादरम्यानच अमेरिकेकडून या युद्धाबाबत अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. मात्र, इराण युद्धातून माघार घेण्यास अजिबातच तयार नाही. ठेवलेल्या अटी जोपर्यंत पूर्ण होणार नाही, तोपर्यंत युद्धातून आपण मागे हटणार नसल्याची भूमिका इराणने घेतली. शिवाय त्यांनी थेट इशाराही दिला. होर्मुज खाडीतून जहाजांनी जाताना इराणी अधिकाऱ्यांसोबत संपर्क करूनच जावे, अशी मोठी चेतावणी इराणकडून देण्यात आली. इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान आता एक अत्यंत मोठी आणि चांगली बातमी भारतासाठी येत आहे. इराण अमेरिका युद्धात भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा झाला. थेट व्यावसायिक सिलेंडर वितरणही बंद करण्यात आले. आता भारतातील एलपीजी गॅसचा तुटवडा दूर होण्याचे मोठे संकेत आहेत. संयुक्त अरब अमिरातीमधून दोन एलपीजी जहाजे आणि साैदी अरेबियातून एक कच्च्या तेलाचे टँकर भारताच्या दिशेने रवाना झाले.

अमेरिका आणि रशियाचेही जहाज भारतात दाखल झाले. यामुळे आता भारतातील एलपीजी गॅसच्या तुटवड्याची समस्या कमी होण्याचे दाट संकेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे ध्वज लावलेले जहाज एमवी जग वसंत आणि एमवी पाईप गॅस सोमवारी सकाळी 6 वाजता यूएईच्या बंदराहून भारताच्या दिशेने निघाले आहेत. दोन्ही जहाज एकत्रच निघाले असून थोडे अंतर जहाजांमध्ये आहे.

इराणकडून परवानगी मिळाल्यानंतर दोन्ही जहाजांनी होर्मुज खाडी सुरक्षित पार केली. या जहाजांमध्ये तब्बल 92,612,59 मीट्रिक टन एलपीजी गॅस आहे. याच्या माध्यमातून घरगुती एलपीजी सिलेंडर 65 लाख भरले जाऊ शकतात. एमी पाईप गॅस जहाज 28 मार्चला न्यू मैंगलोरला पोहोचेल तर एमवी जग वसंत हे जहाज 26 मार्चला कांडला पोर्टवर पोहोचेल.

इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान भारतात होणारा एलपीजी गॅसच पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. आता पुन्हा भारतात एलपीजी गॅसचे जहाज दाखल झाले. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाच्या किमतीही मोठ्या वाढल्या. यादरम्यानच्या काळात अनेक देश भारताच्या मदतीला धावून आले. आता हळूहळू सर्वकाही सुरळीत होताना दिसत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या

Mount Everest: एव्हरेस्ट शिखरावर विक्रमी चढाई केली, पण उतरताना आक्रीत घडलं; दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी अंत

कोणत्याही क्षणी होऊ शकतो इराणवर मोठा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय..

मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीमध्ये पेच? शिवसेना 7 जागांवर ठाम, आता भाजपच्या भूमिकेकडं लक्ष

Job Vacancy : रेल्वेत नोकरी हवी? ही सुवर्णसंधी सोडू नका ! 6 हजारांहून अधिक पदं भरणार, महाराष्ट्रात किती संधी? जाणून घ्या A to Z माहिती

मोठा हाहाकार! रशियाकडून थेट चीनच्या जहाजावर मोठा हल्ला, जगात खळबळ, भारताने..