IPL 2025 Points Table: आयपीएल 2025 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु झाला आहे. आतापर्यंत 4 सामने खेळवण्यात आले आहे.

IPL 2025 Points Table
1/11

IPL 2025 Points Table: आयपीएल 2025 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु झाला आहे. आतापर्यंत 4 सामने खेळवण्यात आले आहे. या पहिल्या चार सामन्यातच गुणतालिकेत अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळाले.
2/11

सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. हैदराबादचे दोन गुण आहेत. नेटरनरेटच्या आधारावर हैदराबाद पहिल्या स्थानावर आहे.
3/11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएल 2025 च्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बंगळुरुचे देखील दोन गुण आहेत.
4/11

चेन्नई सुपर किंग्स तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईचे दोन गुण आहेत.
5/11

दिल्ली कॅपिटल्सचा संघ दोन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
6/11

गुजरात टायटन्सने अद्याप एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे सध्या ते पाचव्या क्रमांकावर आहेत.
7/11

पंजाब किंग्सनेही एकही सामना खेळलेला नाही. गुजरात आणि पंजाब किंग्स यांच्यात आज सामना रंगणार आहे. सध्या पंजाब किंग्स सहाव्या क्रमांकावर आहे.
8/11

लखनौ सुपर जायट्सचा दिल्लीने पराभव केला. त्यामुळे लखनौने पहिला सामना गमावला. सध्या लखनौचा संघ सातव्या क्रमांकावर आहे.
9/11

मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. चेन्नईने मुंबईचा पराभव केला होता.
10/11

कोलकाता नाईट रायडर्सने देखील 2025 च्या हंगामातील पहिला सामना गमावला. सध्या कोलकाता नवव्या क्रमांकावर आहे.
11/11

राजस्थान रॉयल्सचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबादने राजस्थानचा पराभव केला होता.