IPL 2025: ‘ऑपरेशन सिंदूर’चं यश बीसीसीआयही साजरं करणार; आयपीएलच्या अंतिम सामन्यात विशेष कार्यक्रम

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

IPL 2025: ऑपरेशन सिंदूरचं यश बीसीसीआयही साजरं करणार आहे. 3 जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा अंतिम सामना होईल.

IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग सीझन 18 चा अंतिम सामना (IPL 2025) 3 जून रोजी गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. त्याआधी, येथे एक उद्घाटन समारंभ आयोजित केला जाईल, ज्यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’चं (Opration Sindhoor) यश साजरे केले जाईल. तसेच आयपीएलच्या सांगता समारोहात सेना दलाचा गौरव देखील होणार आहे.

ऑपरेशन सिंदूरचं यश बीसीसीआयही साजरं करणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी बीसीसीआयने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ ऑफ नेव्ही स्टाफ आणि चीफ ऑफ एअर स्टाफ यांना समारोप समारंभासाठी आमंत्रित केले आहे. 3 जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा अंतिम सामना होईल.

भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची सध्या जगभरात चर्चा-

भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची सध्या जगभरात चर्चा होत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारताने आपले लष्करी सामर्थ्य संपूर्ण जगाला दाखवले आहे. विशेष म्हणजे भारताच्या या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे आर्थिक तसेच सामरिक नुकसान झाले आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर राबवताना भारताच्या तिन्ही दलाने आपले शौर्य दाखवले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील (Pakistan-Occupied Kashmir) अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे. भारतीय वायुदलानं 7 मे च्या मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक (Air Strike) करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं होतं.

इतर महत्त्वाच्या बातम्या

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, नाशिकमध्ये आरोग्ययंत्रणा अलर्ट मोडवर, 5 हजार अँटिजन किटची खरेदी

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon