टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा

On: July 30, 2026 11:03 AM
Follow Us:

HSRP Number Plate : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एचएसआरपी नंबर प्लेट 31 डिसेंबरपूर्वी लावून घ्याव्यात असं आवाहन केलं आहे.

मिरा रोड :  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी प्रत्येक वाहनावर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) असणे अनिवार्य करण्यात आले आहे. गुन्हेगारी घटनांमध्ये साध्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा गैरवापर होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती दिली. 31 डिसेंबरपूर्वी एचएसआरपी नंबरप्लेट न लावलेल्या वाहनधारकांनी ती प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाई केली जाईल, असं देखील ते म्हणाले.

परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील जुन्या वाहनांपैकी आतापर्यंत सुमारे एक कोटी वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत. नवीन वाहनांना शोरूममधूनच HSRP नंबर प्लेट दिल्या जातात. मात्र, जुन्या वाहनांपैकी केवळ 55 ते 56 टक्के वाहनांनी आतापर्यंत HSRP प्लेट बसवल्या असून उर्वरित वाहनधारकांनी 31 डिसेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी.

याबाबत कोणालाही सूट दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, मंत्री, खासदार, आमदार किंवा इतर कोणतेही लोकप्रतिनिधी असोत, सर्वांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच लोकप्रतिनिधींनाही नियमांचे पालन करावे लागेल.

परिवहन मंत्र्यांनी सर्व वाहनधारकांना आवाहन केले की, ३१ डिसेंबरपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवून घ्याव्यात. अन्यथा मुदत संपल्यानंतर ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई केली जाईल, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरही नियमांनुसार कारवाई करण्यात येईल.

प्रताप सरनाईक काय म्हणाले?

राज्यातील प्रत्येक वाहनाला एचएसआरपी नंबर प्लेट असणं आवश्यक आहे. कारण विविध प्रकरणांमध्ये परिवहन विभागाला असं आढळून आलं की नंबर प्लेट साध्या बसवल्यानं गुन्हेगार लोकं तशा वाहनांचा वापर करतात. पोलिसांच्या दृष्टीनं ती डोकेदुखी ठरत असते. प्रत्येक वाहनाला एचएसआरपी नंबर प्लेट असाव्यात असा निर्णय परिवहन विभागानं घेतला होता. आतापर्यंत एक कोटी जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावल्या आहेत. 31 डिसेंबरपर्यंत मुदत एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत आहे.  परिवहन मंत्री म्हणून सर्वांना आवाहन करतो की एचएसआरपी नंबर प्लेट वाहनांवर लावून घ्याव्यात. त्यानंतर सामान्य जनतेवर एचएसआरपी नंबर प्लेट न लावल्यानं जी कारवाई करतो ती कारवाई लोकप्रतिनिधींवर करावी लागेल, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now