टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ब्रिस्बेनमध्ये धो धो पाऊस! भारत-ऑस्ट्रेलिया शेवटचा सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी? जाणून घ्या

Follow Us:

IND vs AUS 5th T20 Weather Forecast Marathi News : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेचा शेवटचा सामना शनिवारी ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाणार आहे.

IND vs AUS 5th T20 Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेचा शेवटचा सामना शनिवारी ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाणार आहे. पण त्याआधी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या निर्णायक सामन्यावर पावसाचे संकट घोंघावत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्याच्या दिवशी संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस आणि वीजांच्या कडकडाटासह वादळी हवामान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना कमी ओव्हरचा होऊ शकतो किंवा पूर्णपणे रद्द होण्याचीही शक्यता आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया शेवटचा सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी? (Will rain play spoilsport in India hunt for series win)

सध्या भारत मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर भारत पाच सामन्यांची ही मालिका जिंकेल. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर तिसरा आणि चौथा सामना सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने शानदार कामगिरी करत जिंकले.

ब्रिस्बेनमध्ये धो धो पाऊस (Heavy rain in Brisbane weather forecas)

AccuWeather च्या माहितीनुसार, शनिवारी ब्रिस्बेनमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील. दिवसभरातील कमाल तापमान 32 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 21 अंश राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर वाऱ्यांचा वेग वाढेल आणि संध्याकाळी पावसाची शक्यता अधिक आहे. स्थानिक वेळेनुसार टॉस संध्याकाळी 5:45 वाजता होणार असून सामना 6:15 वाजता सुरू होईल, पण याच वेळेत पावसाचा अंदाज चिंताजनक आहे.

पावसाचा अंदाज (स्थानिक वेळेनुसार) :

  • संध्याकाळी 5 वाजता : 47% पावसाची शक्यता
  • संध्याकाळी 6 वाजता : वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
  • संध्याकाळी 7 ते 8 वाजता : 49% पावसाची शक्यता
  • रात्री 9 ते 10 वाजता : पावसाची शक्यता 60% पर्यंत वाढेलरात्री 11 वाजता : 49% पावसाची शक्यता

म्हणजेच, संध्याकाळ होताच पाऊस सुरू होण्याची आणि नंतर मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. गाबा स्टेडियमचा ड्रेनेज सिस्टम उत्कृष्ट असला तरी सतत पाऊस पडल्यास सामना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टीम इंडियासाठी मोठे आव्हान

भारताची टीम नक्कीच इच्छित असेल की सामना पूर्ण व्हावा आणि विजयानं मालिका संपवावी. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया ही मालिका पराभवाने संपवू इच्छित नाही. त्यामुळे अंतिम निकाल आता पूर्णपणे ब्रिस्बेनच्या हवामानावर अवलंबून असेल.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा कडाडले, आता खरेदी विसराच.. तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचे दर चेक करा पटापट

राजकारणातील सर्वात मोठी बातमी ! बड्या नेत्यासह 25000 जणांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंची ताकद वाढली

मोठी बातमी! पंजाबमध्ये आपच्या वादळात भाजप भुईसपाट; यापूर्वी असा पराभव कधीच झाला नाही, आम आदमी पार्टीचा 680 जागांवर विजय

US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, अमेरिकन लष्करी तळावर हल्ले

Manoj Jarange Patil Hunger Strike : रखरखत्या उन्हात उपोषण, ना अन्न-पाणी ना चप्पल, बळी गेल्यास सरकार जबाबदार; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट