Heart Attack Signs On Face: हार्ट अटॅक येण्याआधी चेहऱ्यावर दिसतात ‘ही’ लक्षणं; वेळीच ओळखल्यास वाचू शकतो जीव

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सध्याच्या काळात ह्रदयविकाराचा धोका वाढत चालला आहे. अनेक तरुणांनाही कमी वयात ह्रदयविकाराचे झटके येत आहेत. पण काही लक्षणं लक्षात घेतली तर तुम्ही ह्रदयविकाराचा धोका टाळू शकता.

1/8

Heart Attack Signs On Face: सध्या धावपळीचं आयुष्य, कामाचा वाढता तणाव, बिघडलेलं मानसिक आरोग्य, अपुरी झोप आणि चांगला आहार न केल्याने अनेकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. आपलं शरीर नेहमीच आपल्याला येणाऱ्या धोक्यांची कल्पना देत असतं. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. यामुळेच जगभरात ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हार्ट अटॅक येण्याच्या एक महिनाआधी शरिरात काही बदल दिसू लागतात.

2/8

सध्याच्या काळात ह्रदयविकाराचा झटका कोणालाही येऊ शकतो. यामुळे शरिराची योग्य काळजी घेणं महत्त्वाचं आहे. छातीत दुखू लागल्यानंतर, बरेच लोक अ‍ॅसिडिटी किंवा पित्ताची समस्या आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. तथापि, सतत दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

3/8

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना किंवा आठवडा आधी, केवळ छातीतच नाही तर शरीराच्या अनेक भागात वेदना सुरू होतात. बरेच लोक या वेदना सामान्य समजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यानंतर मृत्यूची शक्यता वाढते.

4/8

बदलत्या जीवनशैलीमुळे त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. हृदयविकाराच्या एक आठवडा आधी चेहऱ्यावर नेमकी कोणती लक्षणं दिसतात हे जाणून घ्या. ही लक्षणं दिसल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घ्या.

twitter
5/8

हिरड्यांमधून सतत रक्तस्त्राव

हिरड्यांमधून सतत रक्तस्त्राव

हिरड्या लाल होणे किंवा त्यातून रक्त येणं ही नियमित बाब समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण ही समस्या सामान्य नाही. महत्त्वाचं म्हणजे हे हृदयविकाराचा झटका येण्याचं एक प्रमुख लक्षण आहे. त्यामुळेच जर तुमच्या हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य उपचार घ्या. त्यात असलेले हानिकारक विषाणू रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं नुकसान करतात.

twitter
6/8

दातदुखी

दातदुखी

जर तुम्हाला अचानक दातांसंबंधी काही समस्या जाणवली तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. दात हालणे किंवा दुखणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत सर्रासपणे गोळ्या घेतल्या जातात. पण वारंवार गोळ्याचं सेवन आरोग्याला धोकादायक आहे. हार्ट अटॅक येण्याआधी शरिरात सूज येण्याची शक्यता असते. तसंच, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकमुळे शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते.

7/8

तोंड येणे

तोंड येणे

शरीरात वाढत्या उष्णतेमुळे किंवा ताणामुळे तोंडात व्रण होतात. त्यामुळे खाताना किंवा पिताना वेदना होतात. बऱ्याचदा, जेव्हा हे वेदना असह्य होतात, तेव्हा ती थांबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतली जातात. तसंच, त्यामुळे शरीरात रक्ताभिसरण कमी होण्याची आणि अशक्तपणा येण्याची शक्यता वाढते. हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी तोंडात व्रण येणं हे सामान्य समस्या नसून धोक्याची घंटा आहे.

8/8

जबडा दुखणे

जबडा दुखणे

जर तुम्हाला तोंडाच्या, मानेच्या आणि छातीच्या खालच्या भागात वेदना जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य उपचार घेणे महत्वाचे आहे. हृदयविकाराच्या काही दिवस आधी, महिलांना अनेक लक्षणे जाणवतात.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon