टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

महाडीबीटीच्या अनुदानाबद्दल सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, नवीन नियम लागू, थेट..

सरकारकडून 1 एप्रिलपासून अनेक नियमात बदल करण्यात आला. ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. सरकारच्या योजनांचे शेतकऱ्यांना अनुदान हवे असेल तर त्यांना लवकरात लवकर कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत.

शेतकऱ्यांनी इकडे लक्ष द्या.. महाडीबीटीच्या अनुदानाबद्दल सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, नवीन नियम लागू, थेट..

1 एप्रिसपासून अनेक नियमात बदल करण्यात आली. विशेष म्हणजे ही नियम आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याला हे नियम माहिती नसतील तर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शासनाकडून शेतकऱ्यांकरिता विविध प्रकारच्या योजना आणल्या जातात. या योजनांचा मोठ्या प्रमाणात शेतकरी फायदा घेतात. त्यामध्ये कर्जमाफी, पिक विम्यासारख्या योजनांचा समावेश असतो. ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. 1 एप्रिलपासून सरकारने एका मोठ्या नियमात बदल केला आहे. त्यानुसार आपल्याला काही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. जर आपण ही कागदपत्रे जमा केली नाही तर आपल्याला सरकारी योजनेंचा फायदा घेता येणार नाही.

MahaDBT चे अनुदान मिळणार नाही. मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी महाडीबीटी पोर्टलवरील विविध कृषी योजनांच्या अनुदानाची वाट पाहात आहेत. मात्र, या योजनांचे अनुदान हवे असेल तर तुम्हाला काही कागदपत्रे जमा करावी लागतील तरच तुम्हाला याचा लाभ मिळेल. अथवा शासनाच्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. मागील काही दिवसांपासून महाडीबीटी पोर्टलच्या कृषी योजनांचे अनुदान रखडले आहे.

आता टप्प्याटप्प्याने करून शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळणार आहे. मात्र, आता अनुदान प्रक्रियेत काही बदल शासनाकडून करण्यात आली आहेत. 1 एप्रिलपासून नियमात बदल करण्यात आली. आधार आधारित पद्धत अनिवार्य करण्यात आली. महाडीबीटीवरून शेतकऱ्यांकडून अर्ज मागवली जातात आणि आलेल्या अर्जांची छाननी करून निवड केली जाते आणि लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

यापूर्वी या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान थेटपणे जायचे. मात्र, आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून 1 एप्रिलपासून आधार आधारित पेमेंट प्रणालीचा वापर केला जाणार आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधारशी सलग्न असलेल्या बँक खात्यात जमा होईल. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले बँक खाते आधार कार्डसोबत लिंक करावे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना बँक खाते आधारसोबत संलग्न करणे आवश्यक आहे. बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असल्याशिवाय शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती