Bhiwandi Building Collapses: भिवंडी शहरातील बालाजी नगर गंगारामवाडी परिसरात चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

Bhiwandi Building Collapses: भिवंडी शहरातील बालाजी नगर गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत (Bhiwandi Building Collapses) कोसळली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इमारतीच्या ढिगार्याखाली दोन ते तीन जण अडकल्याची शक्यता आहे. पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाचा इमारत कोसळली. भिवंडी अग्निशमन दल, आपातकालीन व्यवस्था तसेच पोलिसांकडून बचावकार्य सुरु आहे. या इमारतीचं नाव कोहिनूर असून 12 ते 14 वर्ष जुनी असल्याची माहिती आहे. या इमारतीला महापालिकेनं धोकादायकची नोटीस बजावली होती.
काल (30 जुलै) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. दरम्यान घटनेची माहिती मिळतात पालिका आपत्कालीन कक्ष अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून आले. परंतु इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता असल्या कारणाने बचाव सुरू करण्यात अडथळे येत होते. त्यानंतर रात्री एक वाजता घटनास्थळी एनडीआरएफचे पथक व टीडीआरएफ दाखल झाले. इमारतीच्या सुरुवातीला असलेली एक जुनी चाळ जेसीबीच्या सहाय्याने तोडून काढल्यानंतर दुर्घटग्रस्त इमारतीपर्यंत यंत्रणा पोहोचली. त्यानंतर बचाव कार्य करण्यासाठी सुरुवात केली आहे. (Kohinoor Apartment Building Collapsed in Bhiwandi)

नेमकं काय घडलं? (Bhiwandi Building Collapse)
कोहिनूर अपार्टमेंट ही 2007 मध्ये असिसमेंट असून 2012 मध्ये ही इमारत बनवण्यात आली असून या इमारतीमध्ये दोन अपार्टमेंट होते. परंतु कमकुवत काम असल्याने सुरुवातीपासूनच इमारत धोकादायक झाल्याने पालिकेने ही इमारत धोकादायक घोषित केली होती. तर या इमारतीच्या एका विंगच्या तळमजल्यावर काही पिलर नादुरुस्त झाल्याने त्याची दुरुस्ती केली जात असल्याने काल सायंकाळी सहा वाजतापासूनच इमारतीला तडे जाण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे रात्री आठ वाजता इमारत झुकत असल्याने पालिका प्रभाग समिती क्रमांक चारचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत इमारत खाली करण्यात येत होती. परंतु तळमजल्यावरील दुरुस्ती काम सुरू राहिल्याने व काही कुटुंबातील व्यक्ती साहित्य घेण्यासाठी इमारतीमध्ये गेलेल्या रहिवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. सदर घटनेनंतर इमारतीमधील कुटुंबीयांचा एकच आक्रोश पाहायला मिळाला. (Bhiwandi Building Collapses)
इमारतीमधील कुटुंब काय म्हणाले? (Kohinoor Apartment Building Collapsed in Bhiwandi)
या इमारतीच्या तळमजल्यावर वरच्या मजल्यावर अनेक जण अडकले होते. अरविंद गुप्ता हे कुटुंब देखील इमारत कोसळत असताना ढिगारा खाली पडत असताना अरविंद गुप्ता व पत्नी बाहेर पडले पण मुलगी कोमल या ढिगाऱ्या खाली अडकली होती. तिने आपली स्वतःची कशीबशी सुटका करून घेत आपला जीव वाचवला. इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना दुर्घटना घडल्याचे तिने सांगितले. या इमारतीच्या दुर्घटनाग्रस्त भागातील रहिवाशींना परिसरातील स्थानिक तरुणांनी तातडीचे मदत करत अनेक कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढले. तर ढिगाराखाली अडकलेल्या दोघांना देखील बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. मात्र अजूनही ढिगाराखाली पाच ते सहाजण असल्याचे माहिती समोर येत आहे . इमारतीमध्ये पिलरचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.
सुनेत्रा पवारांकडून श्रद्धांजली- (Sunetra Pawar On Bhiwandi Building Collapsed)
भिवंडीतील नारपोली परिसरातील कोहीनूर इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुर्घटनेत जखमींवर तातडीने उपचार सुरू असून, घटनास्थळी NDRF, अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दुर्घटनेतील प्रत्येक बाधित कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.













