सांगोला (प्रतिनिधी):- महूद ता. सांगोला गावात 32 वर्षीय जीबीएसचा पहिला रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून, आरोग्य विभागामार्फत तातडीने गावात होम टू होम भेटी देऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. दरम्यान सदर रुग्णांवर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
महाराष्ट्रात पुणे, मुंबई, सोलापूर या ठिकाणी जीबीएसचे रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार दूषित पाणी, अन्नपदार्थ खाण्यामुळे बळावतोय त्यामुळे आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्यासाठी आवाहन केले आहे. दरम्यान महूद गावात 32 वर्षीय जीबीएसचा पहिला रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
साधारण कमरेखालील भागास अशक्तपणा येणे, पायांना मुंग्या येणे, जुलाब होणे , सांधे दुखणे अशी लक्षणे जीबीएस आजाराची आहेत. दरम्यान महूद गावात आरोग्य विभागामार्फत संबंधित जीबीएस रुग्णाची दखल घेऊन घरातील पाण्याचे नमुने तपासणी तसेच गृहभेटी देऊन कोणास अशी लक्षणे आहेत का ? याविषयी माहिती घेऊन आजाराविषयी जनजागृती सुरू केली आहे.
नागरिकांनी दूषित पाणी पिऊ नये ,बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे, स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश खांडेकर यांनी केले आहे.
सांगोला तालुक्यात जीबीएसचा पहिला रूग्ण आढळला; आरोग्य विभाग सतर्क
Nashik Accident: तरुणाची बाईक सिमेंटर मिक्सरच्या चाकांखाली गेली अन्…
दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी