पंढरपूर वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 4 लाखांची आर्थिक मदत; शासनाचा मोठा निर्णय

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

वारी सुरू झाल्याच्या दिनांक पासून म्हणजेच 16 जून ते 10 जुलैदरम्यान, अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तसेच जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी मदतीची तरतूद करण्यात आली आहे .

Aashadhi Wari 2025: विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी जाणारे हजारो वारकरी  शेकडो मैल अंतर कापत पंढरपुरात येतात . 250 किमीच्या प्रवासात काट्या कुट्यातून,चिखलातून माऊलीचा गजर करत पंढरीच्या वारीला निघतात. यंदा महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून वारीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या अपघातात वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे .यासंदर्भातलं नवं परिपत्रक महसूल विभागाने आज जाहीर केला आहे .

या निर्णयामुळे वारीदरम्यान घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमध्ये वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळणार आहे. 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत वारीदरम्यान जर एखाद्या वारकऱ्याचा अपघात, विषबाधा किंवा इतर नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबीयांना ही रक्कम मिळणार आहे. मात्र आत्महत्येच्या घटनांमध्ये ही मदत लागू होणार नाही. याशिवाय, वारीदरम्यान अपघातामुळे अपंगत्व आल्यास देखील आर्थिक मदतीची तरतूद आहे.

मदतीची तरतूद काय?

अपघाताने व दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारांस 4 लाखांची मदत
वारीदरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना 40 ते 60 टक्के अपंगत्व आल्यास 74,000
60 टक्क्यांवरून अधिक अपंगत्व आल्यास 2.50 लाख
एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पीतळात दाखल झाल्यास 16000 रुपये तर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल असल्यास 5400 रुपयांची मदत

कोणत्या घटनांमध्ये मदत मिळणार ?

शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार, विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरता वारी सुरू झाल्याच्या दिनांक पासून म्हणजेच 16 जून ते 10 जुलैदरम्यान, अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तसेच जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी मदतीची तरतूद करण्यात आली आहे . आत्महत्या विषबाधा खून वगळून इतर नैसर्गिक मृत्यू अपघाताने झालेल्या दुर्घटनांमध्ये ही आर्थिक मदत दिली जाईल .

आरोग्य तपासणी

गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी त्याना दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon