टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा

Dattatray Bharne On Farm Loan Waiver: उद्याच आम्ही कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करू. अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे म्हणून उद्याच जाहीर करण्याचा प्रयत्न आहे, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

Dattatray Bharne On Farm Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीची (Farm Loan Waiver) अंमलबजावणी होणार कधी असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडलाय. मात्र, आता 30 जुलैच्या आत कर्जमाफी (Loan Waiver) मिळेल अशी शक्यता निर्माण झालीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत तशी माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली होती, अशी सूत्रांची माहिती आहे. सोबतच, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Agriculture Minister Dattatray Bharne) यांच्याकडून देखील 30 जुलैआधीच सरकारकडून शेतकरी कर्जमाफी करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. केंद्राकडून शेतकऱ्यांच्या आयकर परताव्याचा डेटा अंतिम झाल्याची माहिती आहे. अशातच, राज्य सरकारकडून यासंदर्भात लवकरच कार्यवाही करत कर्जमाफीसंदर्भात येत्या काही दिवसांत अंमलबजावणीला सुरुवात होताना दिसेल.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “उद्याच आम्ही कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करू. अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे म्हणून उद्याच जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. तांत्रिक अडचणी राहिलेल्या नाहीत. आयकर बाबतचा डेटा देखील परवा प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोणतीच अडचण नाही. 30 जुलैपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जाणार, बोगस बियाणं प्रकरणात कारवाईचा धडाका सुरू आहे. 11 हजार 584 तक्रारी प्राप्त आहेत. 81 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…”

खरीप 2025 मध्ये सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेवर सर्वाधिक तक्रारी विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळमधून आल्या आहेत. 11,584 तक्रारींपैकी 8,192 प्रकरणांची तपासणी झाली असून 763 नमुने अमान्य आढळले. यावरून 81 कंपन्यांविरोधात FIR दाखल करण्यात आले आहेत, अशी माहितीसुद्धा समोर आली आहे.

खरीप 2025 मधील बियाणं उगवण क्षमतेबाबतच्या तक्रारींचा प्रगत अहवाल आहे. अहवालातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे…

1. सोयाबीन पिकाची आकडेवारी

  • सरासरी पेरणी क्षेत्र: 47.12 लाख हेक्टर
  • 19 जुलै पर्यंत पेरणी झालेले क्षेत्र: 41.64 लाख हेक्टर

2. बियाणे

  • आवश्यक बियाणे: 13.125 लाख क्विंटल
  • एकूण बियाणे उपलब्धता: 18.57 लाख क्विंटल

3. तक्रारी आणि कारवाई

  • उगवण क्षमते बाबत तक्रारी: 11,584
  • मुख्यतः अकोला, अमरावती, बुलढाणा व यवतमाळ जिल्ह्यात
  • तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने तपासलेली प्रकरणे: 8,192
  • सोयाबीन पिकाची तपासणीसाठी घेतले नमुने: 7,422
  • बियाणे तपासणी प्रयोगशाळेद्वारे अमान्य घोषित नमुने: 763
  • कंपन्यांविरोधात दाखल FIR: 81

4. तक्रार असलेल्या प्रमुख कंपन्या

  • बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा.लि.
  • रवी हायब्रीड सीड्स अँड रिसर्च, अकोला
  • यशोदा
  • पार्श्व जेनेटिक्स एल. एल. पी

5. बाधित क्षेत्र: 1,63,851.10 हेक्टर

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे

Maharashtra Live News : दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?

एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर, ओमराजे निंबाळकर की संजय जाधव कोणाला मिळणार मंत्रिपद, घडामोडींना वेग..

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती

Dattatray Bharne: देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार? कृषिमंत्र्यांनी बोलून दाखवली मनातील इच्छा; म्हणाले…