Electricity Price Hike : ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरवाढ करत ग्राहकांना ‘शाॅक’ दिला आहे. इंधन समायोजन शुल्क लादल्याने ग्राहकांना दरवाढीचा फटका बसणार आहे.
Electricity Price Hike : महावितरणच्या वीज ग्राहकांसाठी एक महत्वपूर्ण आणि काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरवाढ (Electricity Price Hike) करत ग्राहकांना ‘शाॅक’ दिला आहे. इंधन समायोजन शुल्क लादल्याने ग्राहकांना दरवाढीचा (Price Hike) फटका बसणार आहे. परिणामी, ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वीजदरवाढीमुळं घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग या क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. तर घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग ग्राहकांना वीज बिलाचा अतिरिक्त भार येणार आहे.
दरम्यान, 1 आॅक्टोबर रोजी महावितरण सर्क्युलर जारी करत सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहे. तर पुढील आदेशापर्यंत ही दरवाढ लागू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. व्यावसायिक आणि उद्योग ग्राहकांना दरवाढ करण्यात आल्याचा महावितरणचा दावा आहे. तर 9 पैसे दरवाढ झाल्याची माहितीजी पुढील आदेशापर्यंत सुरुच राहणार आहे. सोबतच, पुढील काही वर्षात वीजेचे दर कमी होणार असल्याचं सुतोवाच देखील महावितरणकडून करण्यात आलं आहे. मात्र या दरवाढचा फटका सर्व प्रकारच्या ग्राहकांना बसणार आहे.
500 युनिटपेक्षा अधिक वापरावर 95 पैसे प्रति युनिट (Mahavitaran Issued Circular Over Electricity Price Hike)
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, 1 ते 100 युनिट वापरावर प्रति युनिट 35 पैसे आणि 500 युनिटपेक्षा अधिक वापरावर 95 पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार आहे. वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागली. तसेच, अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला, अशी माहिती महावितरणने दिली.
दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा ‘धक्का’, असे असेल नवे दर (Electricity Price Hike)
1-100 युनिट – 35 पैसे
संबंधित बातम्या





101- 300 युनिट – 65 पैसे
301-500 युनिट – 85 पैसे
501 पेक्षा जास्त – 95 पैसे