टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर, ओमराजे निंबाळकर की संजय जाधव कोणाला मिळणार मंत्रिपद, घडामोडींना वेग..

शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी होताना दिसली. तब्बल 6 खासदारांनी ही बंडखोरी केली. त्यामध्येच काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे कळतंय. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून आमदारांची बैठक घेण्यात आली.

एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर, ओमराजे निंबाळकर की संजय जाधव कोणाला मिळणार मंत्रिपद, घडामोडींना वेग..

शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी ही बंडखोरी केली. दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. यादरम्यानच या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेबद्दल पत्र दिले. त्यानंतर त्यांनी थेट शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर शिवसेनेने या खासदारांविरोधात ऑपरेशन तुडवा सुरू केले. मात्र, याचा कोणताही प्रभाव राज्यात बघायला मिळाला नाही. बंडखोरी खासदारांच्या मतदार संघात स्वत: उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या. यादरम्यान ते बंडखोरी खासदारांवर टीका करताना दिसले. बंडखोर खासदारांच्या मतदार संघात सभा घेऊन येताच दुसरीकडे सचिन आहिर यांनी थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाकरिता शिवसेना ठाकरे गटाकडून अर्ज केला. ज्याने ठाकरे गटाला दुसरा सर्वात मोठा दणका बसला. सचिन आहिर यांची वरळी मतदार संघात मोठी ताकद आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.

ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी केल्यापासून एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दाैरे वाढले आहेत. केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. यामध्ये ठाकरे गटातून बंडखोरी करून शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या खासदारांपैकी काहींना मंत्रिपद मिळणार आहे. याबाबतच हालचालींना वेग आला. अमित शाह यांची भेट एकनाथ शिंदे यांनी घेतली होती.

यादरम्यान आता मोठी अपडेट येत आहे. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दाैऱ्यावर जात आहेत. एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्लीसाठी रवाना होतील. उद्या दिल्लीतील महाराष्ट्र सदन इथे नाॅर्थ इस्टच्या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा पुढील दोन दिवस दिल्लीत मुक्काम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांच्यापैकी एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

एनडीएतील घटक पक्षाच्या बैठकीला ही एकनाथ शिंदे हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला राज्यातील तिन्ही प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतंय. केंद्रात मंत्रिपद नक्की कोणाला मिळते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पंजाबच्या निवडणुका लक्षात घेता हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे कळतंय.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा