एकनाथ शिंदेंनी 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये बोलावून घेतलं अन् डाव टाकलाच, मुंबईच्या महापौरपदावर अडीच वर्षांसाठी दावा?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Eknath Shinde claims Mumbai Mayor: उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत केलेल्या सूचक वक्तव्याची चर्चा रंगली असतानाच आता एकनाथ शिंदे मुंबईत मोठा डाव टाकण्याच्या तयारीत दिसत आहेत.

Eknath Shinde claims Mumbai Mayor: यंदा मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही परिस्थितीत आपलाच महापौर बसवायचा, असा चंग भाजपने बांधला होता. मुंबईच्या (Mumbai) निवडणुकीत 89 वॉर्ड जिंकून भाजप या स्वप्नाच्या जवळही पोहोचली आहे. एकनाथ शिंदे यांचे 29 नगरसेवक सोबत असल्याने मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना-भाजपची सत्ता येणार, हे जवळपास निश्चित आहे. नेमक्या याचवेळी एकनाथ शिंदे यांनी भाजपची (BJP) गरज ओळखून एक मोठा डाव टाकला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईच्या महापौरपदाची (Mumbai Mayor) मागणी केली जाऊ शकते. यंदाचे वर्ष बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यामुळे बाळासाहेबांची ही इच्छा पूर्ण करा आणि शिवसेनेला अडीच वर्ष महापौरपद द्या, अशी भावनिक साद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून घातली जाऊ शकते. याशिवाय, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि सदस्य पदांवरही शिंदे सेनेकडून दावा केला जाऊ शकतो. तसे घडल्यास मुंबईच्या राजकारणात नवी रंगत निर्माण होऊ शकते.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 89 आणि शिंदे सेनेच 29 नगरसेवक निवडून आले होते. तर ठाकरे गटाचे 65 आणि मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी 114 नगरसेवकांची गरज आहे. हा आकडा गाठण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांची मदत घेणे अपरिहार्य आहे. भाजप आपल्याशिवाय मुंबईत महापौर बसवू शकणार नाही, याची जाणीव एकनाथ शिंदे यांना पुरेपूर आहे. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांच्याकडून अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी करण्याचा डाव टाकला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांनी कालच मुंबईतील आपल्या सर्व 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँडस एंड या हॉटेलमध्ये बोलावून घेतले होते. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन होईपर्यंत, शिवसेनेच्या नवनिर्वाचित 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये बोलावून घेतले तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon