टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

जागा वाटप, युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी करु नका; एकनाथ शिंदेंचा पक्षातील नेत्यांना कानमंत्र

Shivsena: निवडणुका सुरू होण्याआधी किंवा चर्चा, जागावाटप यांच्या चर्चा होण्याआधी जागा वाटप आणि युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना दिल्या आहेत.

Image

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. महायुतीच्या नेत्यांनी यावेळी मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान निवडणुका सुरू होण्याआधी किंवा चर्चा, जागावाटप यांच्या चर्चा होण्याआधी जागा वाटप आणि युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना दिल्या आहेत.

जागा वाटपाचा निर्णय हे महायुतीतील तीन प्रमुख नेते घेतील

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदेंनी पक्षातील नेत्यांना कानमंत्र दिला आहे. जागा वाटप आणि युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मित्र पक्षातील संबध ताणले जातील, एकमेकांवरती कुरघोडी टाळण्यासाठी शिंदेकडून उत्तराला प्रतिउत्तर देताना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जागा वाटपाचा निर्णय हे महायुतीतील तीन प्रमुख नेते घेतील, त्यावर इतर नेत्यांनी भाष्य करू नये अशी सूचना माजी नगरसेवकांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी काल (बुधवारी) मुंबईतील माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मंत्र्यांवरही विशेष जबाबदारी

दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मंत्र्यांवरही विशेष जबाबदारी राहणार आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना मुंबईतील विविध विभागांच्या नियोजनासोबतच मुंबईत वास्तव्यास असलेल्या मतदार संघातील नागरिकांचे मेळावे घेऊन एक संघठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोणीही मित्रपक्षांबद्दल, जागावाटपाबाबत किंवा युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह  वक्तव्य करण्याचे टाळण्याबाबत शिंदेंनी सूचना दिल्या आहेत.

मुंबईतील बैठकीबाबत एकनाथ शिंदेंनी दिली माहिती 

एकनाथ शिंदे यांनी काल (बुधवारी) मुंबईतील माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. त्याची माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्सवरून दिली आहे. “विविध राजकीय पक्षांतून #शिवसेना पक्षात सामील झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत आज संवाद साधला. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना तयारीला लागण्याचे निर्देश याप्रसंगी दिले. महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यावर गेल्या अडीच वर्षात केलेली रस्ते काँक्रीटीकरणाची कामे, एसटीपी उभारणीची कामे, सुशोभीकरणाची कामे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य सुविधा वाढवण्याची कामे असतील, कोस्टल रोड, मेट्रोची अशा अनेक लोकोपयोगी कामांची माहिती त्यांना दिली. ही सर्व कामे या माजी नगरसेवकांना समजावून सांगितली आणि ती कामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवावी असे आवाहन याप्रसंगी केले”.

हेही वाचा

मोदी का दिमाग थंडा है, लेकीन लहू गरम है; राजस्थानमधून PM मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Raj Thackeray: राज ठाकरेंची आज डरकाळी, ठाकरे बंधुंच्या युतीनंतर मनसेच्या मेळाव्यात टार्गेटवर कोण कोण?

Jayant Patil: ज्या माणसाशी आमची चर्चा झाली तोच आता…विलिनीकरणावरून जयंत पाटलांनी सुनील तटकरेंना सुनावले, त्या बैठकीत घडलं काय?

वीस वर्षांनी जर आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालता? राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना ‘मनसे’ कानमंत्र!

shiv-sena-ncp-split-due-to-ambition-says-cm-fadnavis

“शिवसेना, राष्ट्रवादी महत्त्वाकांक्षेमुळे फुटले” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मनसे-ठाकरे गटाच्या युतीमध्ये मोठा ट्वीस्ट, राज ठाकरेंनी दिले महत्त्वाचे आदेश

आमदार राजू खरे यांच्या त्या जाहिरातीची एकच चर्चा; आषाढीचा उपवास कोणत्या पक्षात सोडणार?