टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Dattatray Bharne: देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार? कृषिमंत्र्यांनी बोलून दाखवली मनातील इच्छा; म्हणाले…

Dattatray Bharne: देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून केला जात आहे. फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार, यावरून राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.

Dattatray Bharne: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात (Political Circles) सध्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना अचानक उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीला (Delhi) जाणार असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून केला जात आहे. फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार, यावरून राजकीय तर्क-वितर्क लावले जात असतानाच, आता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी यावर एक मोठे वक्तव्य केले आहे. फडणवीस केंद्रात गेल्यास राज्याची धुरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांभाळावी, अशी थेट इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे.

Dattatray Bharne: नेमके काय म्हणाले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे?

दत्तात्रय भरणे म्हणाले की, “मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यांनी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वात जावे, अशी राज्यातील अनेकांची इच्छा आहे. महाराष्ट्रातील व्यक्तीने देशाच्या प्रमुख पदावर विराजमान व्हावे, यासाठी योग्य वेळ लवकरच येईल. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले, तर राज्याचे नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आपल्या पक्षाचाच नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते. त्याचप्रमाणे मलाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते,” असे त्यांनी म्हटले आहे.

Dattatray Bharne: अर्थखात्याच्या तिढ्याबाबत दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य

दरम्यान, दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भीषण विमान अपघाताला (Airplane Crash) आणि निधनाला 5 महिने उलटून गेले आहेत. उपमुख्यमंत्रीपदासह राज्याच्या अर्थखात्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी अजित दादांच्या खांद्यावर होती. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर, समोरच अर्थसंकल्प असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती अर्थखात्याची जबाबदारी स्वतःकडे ठेवली होती.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनीच अर्थसंकल्प (Budget) सादर केला होता. त्यानंतर हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) सोपवले जाईल अशी शक्यता होती, मात्र अद्यापही हा तिढा सुटलेला नाही. यावरून दत्तात्रय भरणे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. अर्थ खात्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्याबाबत सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा होईल. अर्थ खात्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Horoscope Today 22nd August 2026 : आज ग्रहांची चाल बदलणार चित्र ! मेष ते मीन जाणून घ्या राशिभविष्य

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

एका आयफोनमुळे गेला तिघांचा जीव, छत्रपती संभाजीनगरमध्ये डोंगरावरून पडून आई वडील अन् मुलाचा मृत्यू

Plane crash : विमानाचा भीषण अपघात, लँडिगच्या तयारीमध्ये असताना थेट खाली कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू

आश्रमशाळेतील तीन विद्यार्थींनीचा मृत्यू, महाराष्ट्रातील हादरवून सोडणारी घटना

महायुतीत पुन्हा धुसफूस ? शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळेच आज भाजप सत्तेत, त्या पोस्टने सगळंच बाहेर आलं