टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं, जमिनीच्या वादातून माजी सरपंचाचा खून

Follow Us:

Chhatrapati Sambhajinagar Crime News: गावातीलच जमिनीवरील ताब्यावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वादातून अकरा जणांच्या गावगुंडांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांहू पठाण (६८) यांची बुधवारी दुपारी क्रूरपणे हत्या केली.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)जवळील ओव्हरगावच्या गावातीलच जमिनीवरील ताब्यावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वादातून अकरा जणांच्या गावगुंडांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांहू पठाण  यांची  क्रूरपणे हत्या केली. एकीकडे पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या करत होत्या. तेव्हा डोक्यात गुंडगिरी भिनलेली क्रूर टोळी मात्र लाठ्याकाठ्या, लाथांनी पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर घाव (Crime News) घालत होती. दादा पठाण यांचा मृत्यू झाला. रात्री एकास अटक झाली. बाकीचे हल्लेखोर पसार आहेत. इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान, अस्लम गयाज पठाण ऊर्फ गुड्डू, हैदर खान गयाज खान पठाण, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फुरकान अजगर पठाण, रामअवतार सागरमल साबू, मोईन इनायत खान पठाण अशी हल्लेखोरांची नावे आहेत.(Chhatrapati Sambhajinagar)

Chhatrapati Sambhajinagar Crime News:  कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या

गावातीलच जमिनीवरील ताब्यावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वादातून अकरा जणांच्या गावगुंडांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांहू पठाण (६८) यांची बुधवारी दुपारी क्रूरपणे हत्या केली. एकीकडे पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या करत होत्या. तेव्हा डोक्यात गुंडगिरी भिनलेली क्रूर टोळी मात्र लाठ्याकाठ्या, लाथांनी पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर घाव घालत होती. दादा पठाण यांचा मृत्यू झाला. रात्री एकास अटक झाली. बाकीचे हल्लेखोर पसार आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime News:  छोट्या वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात 

इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान, अस्लम गयाज पठाण ऊर्फ गुड्डू, हैदर खान गयाज खान पठाण, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फुरकान अजगर पठाण, रामअवतार सागरमल साबू, मोईन इनायत खान पठाण अशी हल्लेखोरांची नावे आहेत. पठाण यांचे कुटुंब मूळ ओव्हरगातचेच असून, घरासमोरच त्यांची शेती आहे. काही अंतरावर शाळेजवळ त्यांची जमीन आहे. या जमिनीच्या शेजारून एक वाट जाते. सुरुवातीला आरोपींच्या टोळीने या छोट्या वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. कालांतराने पूर्ण जमिनीवरच दावा करण्यास सुरुवात केली. यातून अनेकदा वाद झाले. बुधवारी पठाण यांनी जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी बोलावला. दहा ते अकरा जणांच्या टोळीने पठाण यांच्यावर लाठ्याकाठ्या, रॉडने हल्ला केला. दादा पठाण जागीच मरण पावले.

Chhatrapati Sambhajinagar Crime News:  ‘कानून हमारें हाथ में है’

इम्रान व अफरोजचे पठाण यांच्या घरासमोरच दुकान आहे. सुरुवातीला त्यांनी दादांची मुले अफसर व जुबेर यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या पत्नींनी दोघांना आत नेत कंपाऊंडच्या गेटला कुलूप लावले. त्या विनवण्या करत होत्या. तरीही हल्लेखोर कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत होते. ‘कानून हमारें हाथ में है’ असे म्हणत त्यांनी दादा पठाण यांना लक्ष्य केले. शिवाय, स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव करण्यासाठी स्वतःच्याच दुकानाची तोडफोड केली.

Chhatrapati Sambhajinagar Crime News:  पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री इम्रानला पोलिसांनी पकडले. तर अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे केदार यांनी सांगितले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

कुणाला 5 , तर कुणाला शून्य मते… महाविकास आघाडीचा सर्वात वाईट पराभव; 17 पैकी 17 जागांचा निकाल एका क्लिकवर

Nashik Vidhan Parishad : नाशिक विधानपरिषदेचा धक्कादायक निकाल, महायुतीचा उमेदवार पडला, गोकुळ गिते विजयी, पहिल्याच फेरीत खेळ संपवला

परभणीतील यशवाडीत मोठी दुर्घटना: हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 7 भाविकांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी; VIDEO

Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल, धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

तुपकरांच्या आंदोलनाचा मुंबईत भडका, भरसमुद्रात जलसमाधी आंदोलन, मोठा थरार, पोलिसांची दमछाक

Horoscope Today 16th June 2026 : व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये रहा सावध, मुलांच्या लग्नाची समस्या आज सुटणार, कोणाला मिळणार गुड न्यूज? .. वाचा तुमचं भविष्य !