महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी ते मार्च 2026 या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला. थोड्याच वेळापूर्वी बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन सविस्तर निकाल सादर केला. यंदा 12 वीचा निकाल लागला आहे. यंदाच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली तर सर्वाधिक कमी निकाला हा लातूर विभागाचा लागला आहे. नऊ विभागांमध्ये कोकण हा पहिल्या स्थानी असून या विभागाचा निकाल 94.14 % इतका लागला आहे.

त्रिगुण कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं की, फेब्रुवारी मार्च बारावी परीक्षा १५३ विषयांचे परीक्षा घेण्यात आली. नऊ विभागीय मंडळातून राज्यात एकूण १४ लाख ५८ हजार एवढ्या मुलांनी परीक्षा दिली, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ८९.७९ टक्के इतका लागला आहे. बारावीचा गेल्या वर्षीचा निकाल पाहिला असता 91.88 टक्के लागला होता. दरवर्षी प्रमाणं मुलींनी बारावीच्या निकालात बाजी मारली होती. मुलींच्या निकालाची टक्केवारी 94.54 टक्के इतकी होती. तर, मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 89.51 टक्के इतकी होती. तर कॉपी घडू नये यासाठी अनेक जण लक्ष ठेवून होते, परिक्षा अतिशय चांगल्या पध्दतीने घेण्यात आली एकूण १५ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या परिक्षेदरम्यान १०० कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.
12 वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून 93. 15 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर 86.80 टक्के मुलं उत्तीर्ण झाली. आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच डिजीलॉकरवर (DigiLocker) देखील हा निकाल जाहीर करण्यात येणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे.

Maharashtra 12th Result : राज्याचा निकाल ८९.७९ टक्के
HSC 12th Result : यंदा कोकणची बाजी
लाखो विद्यार्थ्यांचा लागला निकाल
फेब्रुवारी आणि मार्च 2026 दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत, 12 वी आणि 10वीची परीक्षा घेण्यात आली होती. यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून 14 लाख 33 हजार 058 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. दुपारी 1 वाजता वेबसाईटवर निकाल चेक करता येणार आहे.
राज्यात उत्तीर्ण होण्यात मुलींनी परत बाजी मारली
मुलीची ९३.१५ टक्के उत्तीर्ण
मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण
Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीचा विभागनिहाय निकाल
1. मुंबई 90.08 टक्के
2. कोकण 94.14 टक्के
3. पुणे 91.25 टक्के
4. नागपूर 88.67 टक्के
5. अमरावती 90.92 टक्के
6. नाशिक 90.72 टक्के
7. लातूर 84.14 टक्के
8. छत्रपती संभाजीनगर 88.68 टक्के
9. कोल्हापूर 89.97 टक्के.
सलग दुसऱ्या वर्षी निकालाचा टक्का घसरला
फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल 93.37% होता
फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के
खालील दिलेल्या वेबसाईट्सवर विद्यार्थी त्यांचा निकाल चेक करू शकतील
mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
https://hscresult.mahahsscboard.in/

राज्यात उत्तीर्ण होण्यात मुलींनी परत बाजी मारली
मुलीची ९३.१५ टक्के उत्तीर्ण
मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण
सलग दुसऱ्या वर्षी निकालाचा टक्का घसरला
फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल 93.37% होता
फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के
Maharashtra HSC 12th Result Live : पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्णतेची टक्केवारी ३६.४४
Maharashtra HSC 12th Result 2026 (OUT) LIVE : खाजगी विद्यार्थ्यांची टक्केवारी
खाजगी विदयार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३७,५५९ एवढी असून त्यापैकी ३६,९४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतची टक्केवारी ८०.२१ आहे.
















