मनसे-ठाकरे गटाच्या युतीमध्ये मोठा ट्वीस्ट, राज ठाकरेंनी दिले महत्त्वाचे आदेश

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

वरळीतील मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने राज्यात राजकीय चर्चा रंगल्या आहेत. मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील संभाव्य युतीवर चर्चा जोरदार सुरू असताना, राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक विधानांसाठी त्यांची परवानगी घेण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात सध्या मनसे आणि ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे. गेल्या २० वर्षांपासून महाराष्ट ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण अखेर ६ जुलैला पाहायला मिळाला. मुंबईतील वरळी डोम सभागृहात ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. यानिमित्ताने संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र एका मंचावर आले आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा कायमस्वरुपी मिटला. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारत जुन्या गोष्टींवर कायमस्वरुपी पडदा पाडला. या कार्यक्रमानंतर राज्या नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाल्याचे बोललं जात आहे. मात्र त्यातच आता एक मोठा ट्वीस्ट आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटासोबतच्या युतीबद्दल महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत संभाव्य युती करण्यासंदर्भात त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यापुढे कोणत्याही पदाधिकाऱ्याने युतीबद्दल सार्वजनिकपणे बोलण्यापूर्वी माझ्याशी संपर्क साधून परवानगी घ्यावी, असे निर्देश राज ठाकरेंनी दिले आहेत. त्यांच्या या आदेशामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीबद्दलच्या चर्चांना नवा ट्विस्ट मिळाला आहे. तसेच राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अलीकडेच वरळीतील NSCI डोम येथे झालेल्या संयुक्त मराठी जल्लोष मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. या ऐतिहासिक क्षणामुळे दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता. राजकीय विश्लेषकांकडूनही या संभाव्य युतीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात होते.

राज ठाकरेंचा युतीबद्दल सावध पावित्रा

मात्र, आता राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या या स्पष्ट आदेशांमुळे युतीबद्दलच्या चर्चांना विराम लागल्याचे बोललं जात आहे. तसेच हा केवळ एक सावध पवित्रा आहे का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य जनतेमध्येही याबाबत उत्सुकता वाढली आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon