Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून तीन दिवस शासकीय दु:खवटा पाळण्यात आला आहे. अशातच आता अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत एक मोठी अपडेट पुढे आली आहे.
Ajit Pawar Death Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. 28) विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन (Ajit Pawar Death Plane Crash) झालंय. गुरुवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नि दिला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजित दादा अमर रहेचा गजर करत आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप दिला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून तीन दिवस शासकीय दु:खवटा पाळण्यात आला आहे. अशातच आता अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत एक मोठी अपडेट पुढे आली आहे.
राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर बारामती पोलीसांना अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने आधीच या अपघातस्थळी जाऊन नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. हा तपास करताना बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे.

सरकारच्या प्राथमिक अहवालात नेमकं काय? (Ajit Pawar Death Baramati)
सदर विमान 28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आलं. या अहवालानूसार वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाही आणि दृश्यमानता साधारण 3000 मीटर इतकी आहे. त्यानंतर विमानातील पायलटने सांगितलं की ते रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत आहेत. पण त्यांना रनवे दिसत नाहीय. नंतर पायलटने पुन्हा एटीसीला सांगितलं की रनवे दिसू लागला की सांगतो. त्यानंतर 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला. मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, असं एटीसीवर काम करत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
अजित पवारांच्या विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम- (How did Ajit Pawar plane crash?)
पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे
ILS (Instrument Landing System) सुविधा नाहीत.
पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.
धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.
दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.
DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला
रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले
आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
विमानात भीषण आग लागली
आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही
अपघाताचा तपास चालू आहे; DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.
Ajit Pawar Death Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताचा हादरवणारा CCTV
VSR वेंचर्स लिमिटेड लियर जेट 45 विमानाचं अगदी लँडिंगच्या काही तास आधी नियंत्रण बिघडलं आणि विमानाचा भीषण अपघात झाला. विमानाचे तीन तुकडे झाले. बारामती येथील विमान अपघाताच्या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, “आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पण आगीच्या मोठ्या ज्वाळांमुळे आम्ही काहीही करू शकलो नाही. काही मिनिटांतच संपूर्ण विमानाची राख झाली…”











