राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता मंत्र्यांसाठी आयपॅडची खरेदी

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळासाठी अ‍ॅपलच्या आयपॅडची खरेदी करण्यात आली आहे, ई कॅबेनेटसाठी सरकारे हा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळासाठी अ‍ॅपलच्या आयपॅडची खरेदी करण्यात आली आहे, ई कॅबेनेटसाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारकडून अ‍ॅपलच्या आयपॅडसह मॅजिक कीबोर्ड, अ‍ॅपलची पेन्सिल आणि कव्हरची देखील खरेदी करण्यात आली आहे. एका आय पॅडच्या खरेदीसाठी 1 लाख 65 हजार 843 रुपयांचा खर्च आहे, तसेच प्रति मॅजिक किबोर्डसाठी 31 हजार 188 रुपयांची तरदूत करण्यात आली आहे, 7 हजार 268 रुपये अ‍ॅपल पेन्सिलसाठी आणि 8 हजार 850 रुपये कव्हरची किंमत आहे. हे सर्व साहित्य खरेदीसाठी सरकारकडून एकूण 1 कोटी 6 लाख 57 हजार 583 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सरकारकडून संबंधित कंपनीला 50 आयपॅड, 50 कीबोर्ड, 50 पेन्सिल आणि 50 कव्हरची ऑर्डर देण्यात आली आहे, तसेच हे सर्व साहित्य एका आठवड्याच्या आत देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

राज्य सरकारने या वस्तू खरेदीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार ई -कॅबिनेटच्या पार्श्वभूमीवर आयपॅड आणि इतर साहित्य खरेदीची ई-निविदा 9 एप्रिल 2025 मध्ये काढण्यात आली होती. मात्र तांत्रिक निविदा छाननीमध्ये एकही निविदाकार पात्र न ठरल्यामुळे 15 दिवसांच्या कालावधीनंतर 13 मे 2025 रोजी पुन्हा एकदा निविदा काढण्यात आली. या संदर्भातील जाहिरात वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच शासनाच्या संकेत स्थळावरही देण्यात आली होती. दिलेल्या जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या निविदांची तांत्रिक व व्यावसायिक छाननी केल्यानंतर रेडियस सिस्टीम या सेवा पुरवठादार कंपनीचा प्रस्ताव स्विकारण्यात आला आहे, या कंपनीला एका आठवड्याच्या आत सर्व साहित्य पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारकडून ई कॅबिनेटसाठी 50 आयपॅड, 50 कीबोर्ड, 50 पेन्सिल आणि 50 कव्हरची खरेदी करण्यात आली आहे. हे सर्व साहित्य एका आठवड्याच्या आत देण्याचे आदेश देखील संबंधित कंपनीला देण्यात आले आहेत. हे सर्व साहित्य खरेदीसाठी सरकारकडून एकूण 1 कोटी 6 लाख 57 हजार 583 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच हे सर्व साहित्य वेळेत देण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत. यासोबतच अनेक अटी देखील घालण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

Sangola : सांगोला शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर; गुरूवार दि.5 जून 2025

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon