Ashutosh Sharma : हरणारी मॅच जिंकवली, दुसऱ्यांचे कपडे धुणाऱ्याने लखनऊला धुतलं

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Ashutosh Sharma : IPL 2025 चा सीजन सुरु होताच वेगवेगळ्या खेळाडूंची नाव चर्चेत यायला सुरुवात झाली आहे. काल मुंबई इंडियन्सचा विग्नेश पुतुर, आज आशुतोष शर्माची चर्चा आहे. आशुतोष शर्माने काल दिल्लीला हरणारी मॅच जिंकवून दिली. या युवा खेळाडूने कमाल केली. कोणाला वाटलं नव्हतं की दिल्ली जिंकेल.

Dinananth Parab |
सध्या क्रिकेट चाहत्यांच्या तोंडावर हे नाव आहे. आशुतोष शर्माने कामच असं केलय की, त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे. त्याला खरंतर चमत्कार म्हटलं पाहिजे.
1 / 10

210 धावांचा पाठलाग करताना 40 रन्सवर पाच विकेट गेलेले असताना टीमला विजय मिळवून देणं, ही जादचू म्हणावी लागेल. आशुतोष शर्माने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध हे करुन दाखवलं. त्याने 5 चौकार आणि 5 षटकारांच्या बळावर नाबाद 66 धावा फटकावल्या. त्याने विपराज निगम या खेळाडूसोबत अवघ्या 19 चेंडूत अर्धशतकी भागिदारी केली.

2 / 10

त्याने लखनऊच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून आणला. आशुतोष शर्माने दिल्लीला मॅच जिंकवली, पण त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.

3 / 10

आशुतोष शर्माला जग सलाम करतय. पण एकवेळ या खेळाडूला रस्त्यावर धक्के खावे लागत होते. वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी त्याला घर सोडावं लागलं.

4 / 10

आशुतोष शर्माचा जन्म मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये झाला. क्रिकेटर बनण्यासाठी तो इंदूरला आला. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षापासून छोटी-मोठी काम करुन तो पोटाची खळगी भरायचा.

5 / 10

आशुतोषने एका मुलाखतीत सांगितलं की, त्याच्याकडे खायला पैसे नसायचे. उदरनिर्वाहासाठी त्याने स्थानिक स्तरावरील छोट्या-मोठ्या मॅचमध्ये अंपायरिंगची काम केली.

6 / 10

परिस्थिती अशी आली की, त्याला लोकांचे कपडे धुवावे लागले. पण माजी भारतीय क्रिकेटपटू अमय खुरसियाच्या संपर्कात आल्यानंतर त्याचं आयुष्य बदललं.

7 / 10

खुरसियाने आशुतोषच्या खेळावर मेहनत घेतली. त्यामुळे तो मध्य प्रदेशच्या टीममध्ये आला. काही कारणांमुळे त्याला मध्य प्रदेशचा संघ सोडून रेल्वेकडून खेळावं लागलं. रेल्वेत त्याला नोकरी सुद्धा लागली.

8 / 10

आशुतोष शर्माला त्यानंतर आयपीएलमध्ये संधी मिळाली. तिथे त्याने कमाल केली. 2025 मध्ये त्याचं नशीब पालटलं.

9 / 10

यावेळी त्याच्यावर दिल्लीने बोली लावली. आशुतोष शर्माला दिल्लीने 3.8 कोटी रुपयात विकत घेतलं. आता त्याच्यावर लावलेली बोली किती योग्य आहे, हे आशुतोषने दाखवून द्यायला सुरुवात केलीय.

10 / 10
हे सुद्धा वाचा
मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon