Ambadas Danve: मोठी बातमी : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज निरोप समारंभ, पुन्हा विधानपरिषदेत परतणं कठीण?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Thackeray Camp Ambadas Danve: ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ आज संपु्ष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत आज अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचा निरोप समारंभ पार पडत आहे. अंबादास दानवे ऑगस्ट 2019 मध्ये विधान परिषदेवर आमदार (Vidhan Parishad MLA) म्हणून निवडून आले होते. छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या जागेवर अंबादास दानवे विजयी झाले होते. शिवसेनेत झालेल्या पक्ष फुटीनंतर ऑगस्ट 2022 मध्ये अंबादास दानवे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा पक्षाने दिली होती. ऑगस्ट 2025 मध्ये अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या आठवड्यात शुक्रवारी अधिवेशन पूर्ण होत असताना आज अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ आहे.

अंबादास दानवे हे शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. अलीकडच्या काळात ठाकरे गटाची बाजू हिरीरीने आणि आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. आता ते विधानपरिषदेत नसल्यास ठाकरे गटाला आगामी काळात आक्रमक नेत्याची उणीव जाणवण्याची शक्यता आहे.

 

अंबादास दानवेंचा पुन्हा विधानपरिषदेवर निवडून येण्याचा मार्ग कठीण?

अंबादास दानवे यांच्या विधानपरिषदेतील आमदारकीचा काळ संपुष्टात येणार असल्याने आता राजकीय वर्तुळात ते पु्न्हा सभागृहात दिसणार की नाही, याची चर्चा सुरु झाली आहे.  सद्यस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषेदत आमदार म्हणून निवडून येणं शक्य आहे का, अशी चर्चा आता रंगली आहे.अंबादास दानवे यांना पुन्हा त्याच विधान परिषदेच्या जागेवर निवडून येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे गरजेचे आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि जालना मधील महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणूक झाल्यानंतरच या विधान परिषदेत जागेसाठी निवडणूक होईल. तोपर्यंत अंबादास दानवे यांना वाट पहावी लागणार आहे. विधान परिषदेच्या काही जागांचा कार्यकाळ हा 2026 मध्ये संपणार आहे. मात्र, विधानसभा सदस्यातून निवडून येण्यासाठी विधानसभा सदस्य संख्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त 20 आमदारांचे संख्याबळ आहे. अंबादास दानवे यांना पुन्हा निवडून येण्यासाठी विधानसभा सदस्य संख्या किमान 40 ते 45 हवी आहे. परिणामी अंबादास दानवे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येण्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon