Sharad Pawar On Sunetra Pawar And Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात याबाबत गेल्या चार महिन्यांपासून चर्चा सुरू होत्या. त्याचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे होते, अशी माहिती शरद पवारांनी दिली.

Sharad Pawar On Sunetra Pawar And Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. या शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल. दरम्यान आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत. (Sunetra Pawar DCM Oath))
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार गेली अनेक वर्षे संघटनेचं काम करत होते. अजित पवार सामान्यांशी सुसंवाद ठेवून काम करणारा कर्तृत्वान नेता होता, असं शरद पवारांनी सांगितले. अजित पवारांना लोकांच्या प्रश्नांची सखोल माहिती होती. लोकांना न्याय देण्याचं काम अजित करत होता. दैनंदिन कामाची सुरुवात पहाटेच व्हायची. आज अजित पवार हयात असते तर घरी दिसले नसते, फिल्डवर असते, असं शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar On Sunetra Pawar)
अजितदादांची ती इच्छा पूर्ण व्हावी- शरद पवार (Sharad Pawar On Ajit Pawar)
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात याबाबत गेल्या चार महिन्यांपासून चर्चा सुरू होत्या. त्याचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे होते. आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्याचं एकमत होतं. हा निर्णय 12 तारखेला जाहीर करायचं, ही तारीख अजितदादा यांनी दिली होती. दोन्ही पक्षात सकारात्मक चर्चा होती. पण, अचानक ही घटना झाली. दादांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण व्हावी अशी सुद्धा आमची इच्छा आहे, असं शरद पवारांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी आगामी काही दिवसांत एकत्र येणार का, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही- (Sharad Pawar On Sunetra Pawar)
सुनेत्रा पवारांच्या आजच्या शपथविधी सोहळ्यावर विचारले असता मला माहिती नाही, मी सकाळी वाचलं, असं शरद पवार म्हणाले. अजित पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतला. पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची प्रचीती दिसत आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. प्रफुल पटेल, सुनील तटकरे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी ठरवलं आहे, आम्ही त्यावर भाष्य करणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही.
आजचा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
पटेल, तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि तो त्यांचा अधिकार आहे.
अजित पवार यांचे निधन हा राज्यासाठी मोठा आघात आहे.
NCP ने काय करावे, हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवतील.
भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही.
विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. पण आता खंड पडला. त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे, असेही शरद पवार यांनी म्हटले.
अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. अजितदादादा आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरू होती. मी या चर्चेत नव्हतो असे पवार यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती. याविषयीचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता असा गौप्यस्फोटही पवारांनी केला. तर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत खंड पडल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही इच्छा होती असे मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केले.
दोन्ही पक्षात सुसंवाद राहावा यासाठी सकारात्मक चर्चा सुरू होती असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता याविषयीचा निर्णय दोन्ही बाजूचे नेते करतील असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित अनेक वर्षं संघटनेचे आणि सामान्य लोकांशी सुसंवाद ठेवून काम करणारा कर्तृत्वान नेता होता. त्याचं वैशिष्ट्य होतं की लोकांच्या प्रश्नावर माहिती घ्यायची आणि त्यांना न्याय देण्याचं काम करत होता. अजितची कामाची सुरुवात सकाळीच होत असते. आज हयात असते तर ते घरी नसते. कामामध्ये त्याने कधीही अजित ने कमतरता दाखवली नाही.
कर्तृत्व व्यक्ती सोडून जाणे ही आघात आहे हा सगळ्यांवर झाला आहे. या परिस्थितीला समोरं जावं लागेल. लोकांचं दुःख कमी करण्यासाठी आम्हाला लोकांची कामं करावे लागतील. नव्या पिढीची जबाबदारी जास्त आहे.
कुठल्या ही चर्चेत मी नव्हतो
अजित दादा, जयंत पाटील, शशिकांत शिंदे हे एकत्रित येण्याच्या चर्चेत मध्ये सातत्याने होते. आमच्या नव्या पिढीला पुढे आणलं जाईल. जो आघात झाला आहे तो भरून काढला आहे
नरेश अरोरा कोण यांना मी ओळखत नाही.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या ही चर्चा ४ महिने सुरू होती याचं नेतृत्व अजित दादा आणि जयंत पाटील यांच्यावर होती. अपघात झाला आणि यात खंड झाला. आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्याचं एकमत होतं, हा निर्णय १२ तारखेला जाहीर करायचं ही तारीख अजित दादा यांनी दिली होती.
दोन्ही पक्षात सकारात्मक चर्चा होती पण अचानक ही घटना झाली. दादांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण व्हावी अशी सुद्धा आमची इच्छा आहे.




