वजन कमी करण्यासाठी ‘या’ 5 सवयी अंगीकारा, फक्त एका महिन्यात तुम्हाला दिसतील आश्चर्यकारक परिणाम

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

आजच्या धावपळीच्या जीवनात लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत, त्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. याशिवाय मधुमेह आणि हृदयरोगाचा धोकाही वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी आहारासोबत जीवनशैलीतही बदल करणे आवश्यक आहे. चला आजच्या या लेखात जलद गतीने वजन कमी करण्याच्या कोणत्या सवयी अंगिकारल्या पाहिजे ते सविस्तर जाणून घेऊया…

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकं त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेत नसल्याने त्यांना अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. वाईट खाण्याच्या सवयी, अस्वस्थ जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. त्यात जेव्हा वाढत्या वजनाच्या समस्या निर्माण होतात तेव्हा मधुमेह आणि हृदयरोगाचा धोकाही वाढतो . खरंतर आजच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर लोकांकडे वेळेची कमतरता आहे. त्यामुळे कधी कधी बहुतेकजण हे अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न पदार्थ अधिकाधिक प्राधान्य देतात. कारण हे पदार्थ बनवणे सोपे असते, त्यासोबत चविष्ट देखील असते. मात्र हे पदार्था आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. कारण याच्या सेवनाने आपल्या आरोग्यावर अनेक आजारांचा धोका वाढतो.

लठ्ठपणाबद्दल बोलायचे झाले तर वजन झपाटयाने वाढते पण कमी करणे तितकेच कठीण असते. यासाठी लोक जिममध्ये जातात याशिवाय ते अनेक प्रकारचे डाएट फॉलो करतात. वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट असणे आवश्यक नाही. तुम्हाला तुमच्या जीवनशैलीतही काही बदल करावे लागतील. आज आम्ही तुम्हाला अशा काही सवयींबद्दल सांगणार आहोत, जर तुम्ही त्यांचे पालन केले तर तुमचे वजन सहज कमी होऊ शकते. चला त्या सवयींबद्दल जाणून घेऊया –

साखरेचे सेवन कमी करा

तुम्हाला जर वजन लवकर कमी करायचे असेल तर तुम्हाला साखरेचे सेवन कमी करावे लागेल. गोड पदार्थांची क्रेविंग थांबवण्यासाठी फळे खा. यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि वजनही कमी होईल.

प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा

असे म्हटले जाते की जर तुमच्या शरीरात प्रथिनांची कमतरता असेल तर चयापचय मंदावते. जेव्हा चयापचय मंदावते तेव्हा वजन कमी करण्यासाठीच्या अडचणी वाढतात. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवावे. विशेषतः नाश्त्याच्या वेळी. तुम्ही अंडी, चीज, मोड आलेले कडधान्य खाऊ शकता. यामुळे स्नायू मजबूत होतील. फॅट देखील जलद बर्न होईल.

वॉकला जाणे

वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे दररोज 40 मिनिटे वॉक करणे. यामुळे रक्ताभिसरण देखील सुधारते . फॅट बर्न होण्यास देखील मदत होते. तुम्हाला रोज 10 हजार पावले चालावे लागतील. चालण्याचा आणखी एक फायदा म्हणजे ते तुमचा मूड देखील सुधारू शकते.

भरपूर पाणी प्या

दिवसभरात चार ते पाच लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. वजन कमी करण्याचा हा सर्वात प्रभावी आणि किफायतशीर मार्ग आहे. जर तुम्ही रोज चार ते पाच लीटर पाणी प्यायलात तर हे तुमच्या शरीराची पचनक्रिया निरोगी ठेवते, चयापचय वाढवते. तसेच भूकेवरही नियंत्रण ठेवते. याशिवाय पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास देखील मदत करते. अशाने तूमचे वजन जलद कमी होते.

पुरेशी झोप घ्या

वजन कमी करण्यासाठी चांगली झोप घेणे महत्वाचे आहे. झोपेची गुणवत्ता चांगली असताना मूड चांगला होतो. त्यामुळे हॅप्पी हार्मोन्स देखील बाहेर पडतात. यासोबतच तुमच्या शरीराला विश्रांती देखील मिळते. दररोज सात ते आठ तास झोप घेणे महत्वाचे आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

हे सुद्धा वाचा

सतत ब्रेड खाल्ल्याने कॅन्सर होतो? तुम्ही पण करतायत तिच चूक? तज्ज्ञ काय सांगतात?

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon