टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

जवळ्यात २५ वर्षांच्या तरुणाने अख्खी महायुती कामाला लावली,

Follow Us:

जवळा गटात पालकमंत्री, माजी आमदार, आजी माजी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्यांना फुटला घाम

सांगोला ;

संपूर्ण सांगोला तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जवळा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अवघ्या २५ वर्षांच्या ॲड यशराजे साळुंखे पाटील यांनी राज्यात सत्तेवर असणारी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अख्खी महायुती कामाला लावली आहे. अत्यंत मितभाषी उच्चशिक्षित आणि सुसंकृत असलेल्या ॲड यशराजे साळुंखे यांना रोखताना जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार शहाजीबापू पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांना अक्षरशः घाम फुटला आहे.

 

जवळा जिल्हा परिषद गटावर आजवर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. त्यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांना हातमिळवणी करावी लागली एवढेच नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही या गटावर लक्ष ठेवून पवार यांना रसद पुरवली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तालुक्याचे माजी आमदार भाजपचे आजी माजी जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशा सर्वांनी एकत्रित येऊन राजकारणात अत्यंत नवख्या असणाऱ्या ॲड यशराजे साळुंखे पाटील यांना घेरण्याचा डाव आखला आहे. मात्र, साळुंखे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे शिवाय शेतकरी कामगार पक्ष सांगोला तालुका विकास आघाडीच्या पाठिंब्यावर जवळा जिल्हा परिषद गटातील गावोगावी घरोघरी जाऊन प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे यशराजे साळुंखे पाटील यांच्या उमेदवारीचे प्रामुख्याने तरुण वर्गातून स्वागत होत आहे गावोगावी त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता महायुती मधील सर्व घटक पक्षांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

२५ वर्षाच्या पोराची भीती, म्हणून झाली घड्याळ, कमळ आणि धनुष्यबाणांची युती

जवळा जिल्हा परिषद गटात ऐतिहासिक युती झाली आहे. जिल्हा परिषद गटाचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर तर जवळा पंचायत समिती गणाचा उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर आणि वाडेगाव पंचायत समिती गणाचा उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उभा आहे. सर्व पक्ष एकत्र येऊनही जवळा गटात अवघ्या २५ वर्षांच्या ॲड यशराजे साळुंखे पाटील आणि सांगोला तालुका विकास आघाडीचे सर्व उमेदवारांच्या नारळ चिन्हाचीच हवा असल्याचे दिसत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य