टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 13 मे 2025 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप स्वीकारार्ह नाही: भारत-पाकिस्तान आपापसात हा प्रश्न सोडवतील; ट्रम्प दोन दिवसांपूर्वी मध्यस्थीबद्दल बोलले होते

जम्मू-काश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार: 2 शोपियानचे, 1 पुलवामाचा; पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर 15 लाख सायबर हल्ले, फक्त 150 यशस्वी

CBSE बोर्डाचा दहावी-बारावीचा निकाल जाहीर: दहावीत 93.60%, बारावीत 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण; Digilocker-Umangवर मार्कशीट

राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय: कृत्रिम वाळू एम-सँड धोरणास मंजुरी, प्रतिब्रास 200 रुपये सवलत; तर राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवालही स्वीकृत

राजस्थानमधील भारत-पाक सीमेजवळ क्षेपणास्त्रासारखी वस्तू आढळली: काल रात्रीही ड्रोन दिसले, सैन्याने ते पाडले; आजही विमानतळांवर शांतता

राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के, यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल, तर कोल्हापूर विभाग दुसऱ्या स्थानावर

दहावीच्या निकालाचा लातूर पॅटर्न; विभागात 113 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, मुलींनी मारली बाजी 

भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास शत्रूचा सर्वनाश करणार, वेळ आणि पद्धत आम्ही ठरवणार, आदमपूर एअर बेसवरून नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशारा

हाउ इज द जोश… नरेंद्र मोदींचं रात्री भाषण, सकाळी गाठलं ‘आदमपूर’ स्टेशन; वायूदलाच्या जवानांची पाठ थोपटली 

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

 

ऑपरेशन सिंदूर’चा पाकिस्ताननंच दिला मोठा पुरावा, भारताच्या कारवाईत 11 पाकिस्तानी सैनिकांसह 51 जण मारले गेले, कांगावा करणाऱ्या पाकिस्तानचा आता कबुलीनामा

मान्सून अंदमानात दाखल, निकोबार बेटांवर गेल्या 24 तासापासून जोरदार पाऊस सुरू, पुणे-नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी कोसळल्या 

येत्या 6 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज 

कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी, फिरते पथक योजना, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय 

शिंदेंच्या शिवसेनेच्या उदय सामंतांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने मनसेला युतीची ऑफर दिल्याची चर्चा

राज अन् उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चेवर शिवसेना ठाकरे गट सकारात्मक, पण मनसेची वेट अँड वॉचची भूमिका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू, भाजपने भाकरी फिरवली, राज्यात 58 जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर

सर्वसामान्यांना दिलासा, सलग तिसऱ्या महिन्यात महागाई दर 4 टक्क्यांच्या खाली, एप्रिलचा महागाई दर 3.16 टक्क्यांवर तर किरकोळ महागाई दर 6 वर्षांच्या निचांकी पातळीवर

शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex 1280 तर Nifty 346 अंकांनी आपटला, गुंतवणूकदारांचे 1.28 लाख कोटींचे नुकसान; सोमवारच्या तेजीनंतर मंगळवारी बाजार गडगडला, तीन मोठी कारणे समोर 

कसोटीमधून निवृत्ती घेताच विराट कोहली अनुष्कासोबत प्रेमानंद महाराजांच्या चरणी, दोघेही आनंदी राहा, बाबांचा विराट-अनुष्काला आशीर्वाद

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा: ग्रीन परतला, लॉर्ड्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना

कोहली 7 मे रोजी निवृत्त होणार होता: ऑपरेशन सिंदूरमुळे बीसीसीआयने म्हटले- काही दिवस वाट पाहा

IPL 2025 चे नवीन वेळापत्रक जाहीर: सुरुवात बंगळुरू-कोलकाता सामन्याने होईल, 17 मे ते 3 जून कालावधीत होतील एकूण 17 सामने

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now