दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार, 5 जुलैच्या मराठी मोर्चात बंधूभेट! संजय राऊतांची घोषणा
-
हिंदीच्या सक्तीवर महायुती सरकारमध्येच मतभेद: अजित पवार म्हणतात – पहिली ते चौथी हिंदी नको; एकनाथ शिंदेंची भूमिका भाजपला पुरक
-
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची झलक: संदीप देशपांडे – वरुण सरदेसाई यांची हॉटेलमध्ये भेट, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत हालचाली वाढल्या
-
गुणरत्न सदावर्तेला एक दिवस मराठी माणूस जाम चोपेल: मनसेच्या नेत्याने दिला इशारा; सदावर्ते हा भाजपने पाळलेला माणूस असल्याचा दावा
-
मराठीवर अन्याय होता कामा नये ही आमची भावना: स्थानिक भाषांचे महत्त्व कमी करण्याचे सरकारचे प्रयत्न, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
-
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे राजकीय पडसाद: शिक्षणमंत्र्यांना पहिलीत पाठवा, ते तिथेही नापास होतील, आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात
-
संदीपान भुमरेंचा चालक 150 कोटींच्या भूखंडाचा मालक: हैदराबादच्या कुटुंबाने जमीन ‘भेट’ दिल्याचा दावा; आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी
-
जेव्हा ईश्वराची इच्छा असते तेव्हा हे जुळून आलं, मराठीसाठी हे दोघे एकत्र येणे आनंदाची गोष्ट, ठाकरेंचे मामा चंदूमामा वैद्य यांची प्रतिक्रिया
-
मला अत्यंत आनंद झालाय,ज्या रस्त्यावर एकत्र चालावं असं वाटतं होतं, त्यावर पहिलं पाऊल पडलंय, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य
-
राज अन् उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देणार नाही; गुणरत्न सदावर्तेंचा इशारा, मुंबई पोलीस अन् दादा भुसेंना पत्र देणार
-
भाजपचा मराठी-हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार, नरेंद्र मोदींमुळं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणार
-
मराठी भाषा अनिवार्य तर हिंदी भाषा ऐच्छिक, गैरसमज पसरवू नये,आशिष शेलार यांचं वक्तव्य
-
सरकारने पहिली ते चौथीला हिंदीचा हट्ट करु नये, शरद पवार यांची भूमिका, राज ठाकरेंचा मुद्दा समजून घेणार
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सगळ्यांनी चांगलं काम केलं तर कधीही चांगलंच,वाईट वाटायचं कारण नाही; शरद पवार यांची राजकीय गुगली
-
पहिली इयत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती अजिबात असू नये,दोन्हीची लिपी देवनागरी असल्या तरी व्याकरण वेगळं, मराठीतील ऱ्हस्व हे हिंदीत दीर्घ, अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडून ठाम भूमिका
-
समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याजवळ भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने तीन वेळा पलटी मारली,नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू, पत्नी आणि मुलं जखमी
-
सलमान खानला काही महिन्यांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या,भाईजाननं नवीकोरी मर्सिडीज-मेबॅक जीएलएस 600 एसयूव्ही बुलेटप्रूफ कार घेतली, खरेदीसाठी 3.40 कोटी मोजले
-
रोहित म्हणाला- टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून बदला घेतला: भारत 24 धावांनी जिंकला, एकदिवसीय विश्वचषक अंतिम पराभव संघाच्या मनात होता
-
ICC ने क्रिकेटच्या 6 नियमांत केले बदल: टेस्टमध्ये 60 सेकंदांत सुरू करावे लागेल षटक; दोन वेळा वॉर्निंगनंतर 5 धावा वजा होणार
-
कोलंबो कसोटीच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा संघ 458 धावांवर ऑलआउट: पथुम निस्सांकाचे शतक; चहापानाच्या ब्रेकपर्यंत बांगलादेशचा स्कोअर- 31/1