टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मा.नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त 5 नोव्हेंबर रोजी सांगोला येथे भव्य महाआरोग्य शिबिर

Follow Us:

मोफत चष्मे वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार

सांगोला (प्रतिनिधी) :- मा. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विचारांचे वारसदार व मा. नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, बुधराणी हॉस्पिटल पुणे व सुपर आय केअर, दक्षता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायं 4 वाजेपर्यंत सांगोला शहरातील वज्राबाद पेठ येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामाजिक उपक्रम नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन राबविण्यात आला असून, पुण्यातील नामांकित रुग्णालये व वैद्यकीय तज्ज्ञांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडणार आहे.

यावेळी रुग्णांना अनेक वैद्यकीय विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार मिळणार असून विशेष म्हणजे मोफत चष्मे वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच डोळ्यांवरील शस्त्रक्रिया, मांस काढणे, रेटिना तपासणी, बुबुळ बदलणे, भिंगरोपन शस्त्रक्रिया व उपचारांसह नेत्रविषयक तज्ञ सेवाही उपलब्ध राहणार आहेत.तसेच 1 ते 15 वयोगटातील मुलांसाठी मोफत दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, शहरातील पालकांनी मुलांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे सांगोला तालुका व परिसरातील नागरिकांना माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या दूरदृष्टीतून मोफत व दर्जेदार वैद्यकीय सेवा एका ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील व ज्येष्ठ नागरिकांसाठी हे शिबिर मोठी सोय ठरणार आहे, या शिबिराप्रसंगी मेडिसिन विभाग, मूत्ररोग विभाग, बालरोग विभाग, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, हृदयरोग व कॅथ लॅब, अस्थिरोग विभाग, सर्जरी व गॅस्ट्रो इंटेरिलीजी विभाग, डायलिसिस आदी संदर्भात तपासणी करून सल्ला देण्यात येणार आहे.यावेळी तज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थितीत राहणार आहे.

महाआरोग्य शिबिरास शहरासह तालुक्यातील गरजू नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व नागरिकांनी आधार कार्ड सोबत आणण्याची विनंती सोमेश यावलकर मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण ‘असे’ फुटले बिंग, नेमकं काय घडलं?

उन्हाळी सुट्टीत घरातच मुलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी उपयुक्त इनडोअर अ‍ॅक्टिव्हिटीज

संत सोपानदेव पालखी सोहळ्याला वेग; पालखीचे 12 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान

सोलापुरात खळबळ ! काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद, ऐनवळी मोठा गेम

सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर विधान परिषद निवडणूक: शेकापचा भाजपला पाठिंबा, राजकीय समीकरणे बदलणार!