टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Follow Us:

Kalyan-Ahilyanagar Highway Accident: कल्याण अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी आहे.

अहिल्यानगर : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर आज काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) झाला आहे. एका ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली असून, या भीषण अपघातात आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.(Kalyan-Ahilyanagar Highway Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या धडकेनंतर ईको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सिमेंट मिक्सर आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. या भीषण धडकेत आठ जणांनी जागीच प्राण गमावले आहेत.(Kalyan-Ahilyanagar Highway Accident)

Kalyan-Ahilyanagar Highway Accident:  स्थानिकांची मदतीसाठी धाव

अपघाताचा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना आणि जखमीला बाहेर काढले.

या अपघातातील एकमेव गंभीर जखमी व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, अमेरिकन लष्करी तळावर हल्ले

Manoj Jarange Patil Hunger Strike : रखरखत्या उन्हात उपोषण, ना अन्न-पाणी ना चप्पल, बळी गेल्यास सरकार जबाबदार; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट  

चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या

Mount Everest: एव्हरेस्ट शिखरावर विक्रमी चढाई केली, पण उतरताना आक्रीत घडलं; दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी अंत

कोणत्याही क्षणी होऊ शकतो इराणवर मोठा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय..