टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अखेर पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्यावर ऑनलाईन तक्रार दाखल 

On: April 7, 2026 12:10 PM
Follow Us:

मारहाण केलेल्या ॲड सागर मेटकरी यांनी दाखल केली ऑनलाईन तक्रार 

सांगोला ; संपूर्ण राज्यभर गाजत असणाऱ्या सांगोला येथील वकील मारहाण प्रकरणी अखेर वादग्रस्त पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्यावर या प्रकरणातील पीडित वकील ॲड. सागर मेटकरी यांनी तक्रार दाखल केली आहे. सोमवार दि. ६ एप्रिल रोजी ऑनलाईन पद्धतीने ही तक्रार दाखल केली आहे.
ॲड सागर मेटकरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवार दि ३१ मार्च रोजी तक्रारदार यांच्या नातेवाईक रावसाहेब मेटकरी यांनी रात्री ९.३० च्या सुमारास ॲड सागर मेटकरी यांना सांगोला पोलीस स्टेशन मध्ये बोलावले होते. यावेळी ते सांगोला पोलीस स्टेशनच्या आवारात उभे असताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तु इथे कशाला आला आहेस ? असे तक्रारदार ॲड सागर मेटकरी यांना विचारले. यावेळी त्यांच्यासमवेत ५ ते ६ पोलीस कर्मचारी त्यांच्यासमवेत आले होते. यावेळी ॲड. मेटकरी यांनी मी वकील आहे, आणि माझे नातेवाईक रावसाहेब मेटकरी यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी मी इथे आलो आहे असे सांगितले. यावर पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी ॲड सागर मेटकरी यांना तू वकील असला तर जे काही आहे ते कोर्टात बघ, इथे यायचे नाही असे म्हणून ॲड मेटकरी यांना कानाखाली लगावली. यावर ॲड मेटकरी यांनी मी एक वकील आहे तुम्ही मला विनाकारण मारहाण करू शकत नाही असे म्हटले यावर चिडलेल्या पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी ॲड सागर मेटकरी यांना आईवरून शिवीगाळ केली आणि ॲड मेटकरी यांच्या कॉलरला धरून घुगे व कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या बाजूला असणाऱ्या पत्र्याच्या खोलीत नेले व ॲड. मेटकरी यांना आणखी मारहाण केली व त्याचा मोबाईल काढून घेतला आणि याबाबत तू कुणाला तक्रार केली तर तुला या गुन्ह्यामध्ये अडकवून जेलमध्ये सडवीन अशी धमकी दिली. आणि ॲड मेटकरी यांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या असेही दाखल केलेल्या तक्रारीत नमूद आहे.

पोलीस निरीक्षक विनोद घुगे आणि त्यांच्या ५ ते ६ पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत मी २ एप्रिल रोजी सांगोला पोलीस स्टेशनला लेखी निवेदन दिले होते मात्र याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने आज मी माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल केली आहे. 

ॲड सागर मेटकरी, सांगोला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Horoscope Today 22nd August 2026 : आज ग्रहांची चाल बदलणार चित्र ! मेष ते मीन जाणून घ्या राशिभविष्य

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

एका आयफोनमुळे गेला तिघांचा जीव, छत्रपती संभाजीनगरमध्ये डोंगरावरून पडून आई वडील अन् मुलाचा मृत्यू

Plane crash : विमानाचा भीषण अपघात, लँडिगच्या तयारीमध्ये असताना थेट खाली कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज