LPG Price Hike India: इराण विरूद्ध इस्राईल युद्धामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान पुण्यातील एका हॉटेल मालकाने या परिस्थितीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरलं. त्याच्या नावानं एक पाटी सुद्धा लावली. या पाटीवरील मजकूर वाचून खरंच तुम्हाला हसू आवरणार नाही.

काय लिहिलं आहे या पाटीवर?
ही पाटी पुण्यातील एका हॉटेलच्या दरवाज्यावर लावण्यात आली आहे. त्यामध्ये लिहिलं आहे, “नारंगी केसांच्या माणसामुळे सुरू झालेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे एलपीजी गॅस आणि प्लास्टिक कंटेनरचे दरही वाढले आहेत. म्हणून २१ मार्चपासून नवीन दर लागू करण्यात येत आहेत. कृपया सहकार्य करा, नाहीतर युद्ध थांबवा.” पदार्थांचे दर वाढले आहेत, पण त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरलं जात आहे. ही पुणेरी पाटी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे आणि त्यावर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
नेटकरी घेत आहेत फिरकी
ही पोस्ट @SMahashur या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. आतापर्यंत ही पाटी २ लाख ४७ हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतंय, “हे युद्ध आता फक्त पुणेकरच थांबवू शकतात,” तर कोणाला प्रश्न पडलाय, “युद्ध थांबवायचं कसं?” असो, तुम्हाला हा पुणेरी टोला कसा वाटला? तुम्हीही आपल्या प्रतिक्रिया द्या.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)
महाराष्ट्र बातम्या
5 नवीन स्मार्टफोन्स लॉन्च होणार, OnePlus 15T पासून Galaxy A57 पर्यंत, यादीच वाचा










