टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Solapur Rain : महाराष्ट्रावर ‘अवकाळी’ संकट, गारपीट अन् पावसाच्या तडाख्यानं उभी पिकं झाली आडवी; बळीराजाला रडू कोसळलं

On: March 21, 2026 11:32 AM
Follow Us:

Maharashtra Unseasonal Rain : दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. यात उभी पिकं आडवी झालीय.

1/8
Maharashtra Unseasonal Rain : अवकाळी पावसाने उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. गारपीठ आणि अवकाळी पावसामुळे हिरव्यागार द्राक्ष बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या आहेत.

2/8
उभं पीक डोळ्या देखत आडवं झाल्याने बळीराजा पुन्हा हवालदिल झाला आहे. दरम्यान, या नुकसानाची पाहणी माहिती-तंत्रशिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली.

3/8
यावेळी आपली उध्वस्त झालेली शेती दाखवताना शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. पडसाळी गावातील शेतकरी अंकुश शिरसाट यांच्या साडेतीन एकरांतील द्राक्ष बाग पूर्णपणे उध्वस्त झाली असून, अनेक महिन्यांची मेहनत काही क्षणात वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झालाय.

4/8
दरम्यान, मंत्री आशिष शेलार यांच्यासमोर शेतीची अवस्था सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी आशिष शेलार यांनी शेतकऱ्यांना धीर देत सरकार पाठीशी असल्याचे आश्वासन दिले.

5/8
सोलापूर दौऱ्यावर असताना आज मंत्री अँड आशिष शेलार यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी या गावी गुढीपाडव्याच्या दिवशी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. अंकुश दासा शिरसाट यांच्या द्राक्ष बागेची आज पाहणी केली.

6/8
यावेळी उपस्थित अधिकारी निलेश पाटील, (तहसीलदार), कन्याकुमारी भोसले, (मंडल अधिकारी), आरती देशमुख (तलाठी), व्ही एम बोसकर,( कृषी सहाय्यक ) तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच शशिकांत चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष, शहाजी पवार, (माजी जिल्हाध्यक्ष ), अविनाश शिरसाट, (पडसाळी गाव अध्यक्ष भाजपा) आदी या दौऱ्यात सहभागी झाले होते.

7/8
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांना अधिकची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार, अशी प्रतिक्रिया यावेळी आशिष शेलार यांनी दिली.

8/8
पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत. उत्तर सोलापूर जिल्ह्यात जवळपास 400 शेतकऱ्यांचे नुकसान झालेय. कृषिमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना याबाबत अवगत करणार, असेही मंत्री आशिष शेलार यावेळी म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now