टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई

Follow Us:
103 Teachers Suspended in Class 10 and 12 Mass Copying

ज्या कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी परीक्षेच्या गोपनीयतेचा भंग केला आहे किंवा गैरप्रकारांना खतपाणी घातले आहे, त्यांच्यावर गुन्हे (FIR) दाखल करण्याची प्रक्रिया देखील मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे.

Class 10 and 12 Mass Copying: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर मोहीम उघडली आहे. परीक्षेदरम्यान झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणाची गंभीर दखल घेत मंडळाने तब्बल 103 शिक्षकांना निलंबित केले असून, या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याने पकडले गैरप्रकार

गेल्या काही काळापासून परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे अधिक भक्कम केले होते. या तंत्रज्ञानाचा वापर यशस्वी ठरला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या सखोल तपासणीतून सामूहिक कॉपीचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. ज्या केंद्रांवर नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत केली जात होती, अशा केंद्रांवरील फुटेज पुरावा म्हणून वापरण्यात आले आहेत.

शिक्षकांवर निलंबनाची कुऱ्हाड

या तपासात दोषी आढळलेल्या 103 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केवळ निलंबनावरच न थांबता, ज्या कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी परीक्षेच्या गोपनीयतेचा भंग केला आहे किंवा गैरप्रकारांना खतपाणी घातले आहे, त्यांच्यावर गुन्हे (FIR) दाखल करण्याची प्रक्रिया देखील मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे.

1. बीड आणि छत्रपती संभाजीनगर: केंद्रांवर गुन्हे दाखल

बीड (चौसाळा): कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात (केंद्र 224) 10 फेब्रुवारीला पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपी उघड झाली. प्रशासनाने 17 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले. तसेच यशवंत विद्यालयाचे केंद्र संचालक ए. एम. राऊत यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली.

छत्रपती संभाजीनगर (कन्नड): जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात (केंद्र 0079) सीसीटीव्हीमध्ये पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना मदत करताना दिसले. या प्रकरणी २४ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून 21 जणांना निलंबित करण्यात आले आहे.

2. वाशिम जिल्हा: गैरप्रकारांचा केंद्रबिंदू

वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक ठिकाणी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

जुमडा फाटा: श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात १६ फेब्रुवारीला भौतिकशास्त्राच्या पेपरला तब्बल ५८१ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

इतर केंद्रे: शेंदूर्जाना आढाव (3 कर्मचारी निलंबित), रुईगोस्ता (5 कर्मचारी निलंबित), मांडवा (7 कर्मचारी निलंबित), रिसोड (3 कर्मचारी निलंबित) आणि लेहणी केंद्रावर सीसीटीव्हीच्या आधारे 2 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

3. मराठवाडा: जालना, नांदेड आणि धाराशिव

जालना (मंठा): इंग्रजीच्या पेपरमध्ये कॉपीला साथ देणाऱ्या 5 पर्यवेक्षकांना घरी पाठवण्यात आले आहे.

नांदेड (मुखेड): येथे चक्क ‘डमी’ विद्यार्थी परीक्षा देताना आढळला. या गंभीर प्रकरणी तोतया विद्यार्थ्यासोबतच केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षिकेवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले.

धाराशिव (तुळजापूर): सलगरा येथील केंद्रावर 9 विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले, ज्यातील 6 जणांकडे मोबाईल होते. येथे 3 शिक्षक निलंबित झाले असून 3 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

4. गडचिरोली: ‘हायटेक’ कॉपीवर कारवाई

नक्षलग्रस्त भागातही मंडळाची करडी नजर होती. ब्रोमनवार विद्यालयात (केंद्र 615) राज्यशास्त्राच्या पेपरला मायक्रोनोट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून तयार केलेले मुद्रित साहित्य सामूहिक कॉपीसाठी वापरण्यात आले. या प्रकरणी 3 शिक्षक आणि 1 शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती