टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

जगात हाहाकार! इराणची हादरवणारी धमकी, थेट म्हटले, काहीही झाले तरीही…

Follow Us:

मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. या युद्धात जगातील जवळपास सर्वच देश भरडले जात आहेत. आता मोठी खळबळ उडवणारे विधान इराणकडून करण्यात आले. थेट डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेत हे विधान करण्यात आले आहे.

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा आज 14 वा दिवस आहे. या युद्धामुळे पूर्ण जग संकटात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट म्हटले की, आम्ही विजयाच्या अत्यंत जवळ आहोत, इराणकडे ताकद शिल्लक राहिली नाही. मात्र, इराणकडून हे युद्ध सुरू राहणार असल्याचे संकेत आहेत. यासोबतच युद्ध थांबवायचे असेल तर तीन प्रमुख अटी इराणकडून घालण्यात आल्या या अटी अमेरिकेने मान्य केल्या तरच युद्ध थांबणार असल्याचे मोठे इराणकडून सांगण्यात आले. इराणसोबतचे युद्ध इतके जास्त कठीण असेल असे अमेरिकेला एक टक्काही वाढले नव्हते. यादरम्यानच इराणकडून थेट डोनाल्ड ट्रम्प यांना वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुखत्या नसवर हात ठेवत इराणकडून मोठे भाष्य करण्यात आले. इराणकडून थेट धमकीही देण्यात आली. फक्त ट्विट करून युद्ध लढता येत नसल्याचे इराणने म्हटले.

इराणचे उच्च अधिकारी अली लाजीजानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, ट्रम्प यांना युद्ध सुरू करण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प युद्ध लवकर जिंकण्याच्या शोधात आहेत. युद्ध सुरू करणे सोपे आहे, पण त्याला ट्विट करून जिंकता येत नाही. आम्ही तोपर्यंत मागे हटणार नाही जोपर्यंत तुम्हाला तुम्ही केलेल्या चुकीचा पश्चाताप होईल. हेच नाही तर अली लारीजानी यांनी ही पोस्ट शेअर करताना थेट #TrumpMustPay देखील लिहिले आहे.

इराणचे सर्वेाच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे की, हे युद्ध आमच्याकडून सुरूच राहणार आहे. होर्मुज मार्ग बंद केल्याने अमेरिका आणि इस्त्रायलवरील दबाव वाढला आहे. इराणकडून काही देशांकरिता या मार्ग खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अमेरिकेची आणि इस्त्रायलची मदत करणाऱ्या देशांबद्दल त्यांची भूमिका तीच आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी बोलताना म्हटले होते की, होर्मुज मार्ग सुरक्षित असून इराणच्या नाैदलाकडून काहीच ताकद शिल्लक नाही. यामुळे होर्मुज मार्गाचा वापर करा. मात्र, त्यानंतर इराणकडून थेट जहाजांना आग लावून देण्यात आल्याने खळबळ उडाली. होर्मुज मार्ग इराणकडून बंद ठेवण्यात आल्याने अनेक देश संकटात आली आहेत.

हे सुद्धा वाचा

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’ सिनेमातील बडे साहब नक्की कोण? मोठं सत्य अखेर समोर आलंच

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now