टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

IND vs NZ Final : फायलनपूर्वी भारताला न्युझीलंडकडून वॉर्निंग, बुमराबद्दल मोठा इशारा

टी 20 वर्ल्डकमधील तिसरा अंतिम सामना खेळण्यास भारतीय संघ सज्ज झाला आहे. न्युझीलंडशी उद्या भारताची टीम भिडणार आहे. मात्र या मॅचपूर्वी न्युझीलंडने भारताला मोठा इशारा दिलाय.

बुधवारी 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडेवर झालेल्या सेमीफायनलमध्ये भारतीय टीमने (Team India) इंग्लंडला (England)  7 धावांनी हरवत टी-20 वर्ल्डकपच्या (T 20 World Cup)  अंतिम फेरीत पुन्हा धडक मारली. या विजयानंतर, भारतीय संघ आता तिसरा टी-20 वर्ल्डकप जिंकण्यासाठी अंतिम सामन्यात न्यूझीलंडशई भिडणार आहे. एकेकाळी इंग्लंडच्या संघाविरुद्ध 254 धावांचा बचाव करणं देखील भारतीय संघासाठी कठीण वाटत होते, परंतु डेथ ओव्हर्समध्ये जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीने संपूर्ण खेळ पलटला आणि भारताने विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं. उद्या, रविवार 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत वि. न्युझीलंड यांची फायनल मॅच रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचा स्टार खेळाडू ग्लेन फिलिप्सने बुमराहबद्दल एक महत्त्वाचे विधान केलं आहे.

बुमराहबद्दल काय म्हणाला ग्लेन फिलिप्स ?

भारतीय वेगवान गोलंदाज असेला बुमराह हा एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. पण त्याचाही एखादा दिवस वाईट असू शकतो ना. एखादा दिवस वाईट जाऊ शकतो नाा. रविवारी फायनल मॅचमध्ये न्युझीलंडचा संघ याच आशेने खेळेल असं न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्स म्हणाला. भारताचा स्टार खेळाडू असलेल्या बुमराहने पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध प्रभावी कामगिरी केली आहे. डेथ ओव्हर्समध्ये त्याची बॉलिंग उत्कृष्ट असते.

बुमराहकडूनही चुका होऊ शकतात ना..

टी-20 वर्ल्डकप पूर्वी झालेल्या द्विपक्षीय मालिकेत ग्लेन फिलिप्सला बुमराहविरोधात थोड्याफार प्रमाणात यश मिळालं होतं. पण चुका करणं हा मनुष्याचा स्वभाव असतो आणि बुमराह देखील माणूस असल्याने त्याच्याबाबतीत देखील असं घडू शकतं, असं ग्लेनला वाटतं. त्यामुळे फिलिप्सने फायनलपूर्वी यजमान भारतीय संघाला मोठा इशारा दिला. बुमराहचे कौतुकही त्याने केलं. “बुमराह हा एक उत्तम गोलंदाज आहे. त्याच्याकडे खूप व्हरायटी आहेत. तो डेथ ओव्हर्समध्ये खूप चांगली गोलंदाजी करतो. पण तोही एक माणूसच आहे. आपल्या इतरांप्रमाणेच त्याचाही दिवस वाईट असू शकतो. त्यामुळे आशा आहे की, त्याच्याविरुद्ध आमचा दिवस चांगला जाईल.” असं फिलिप्सने नमूद केलं.

सेमीफायलनमध्ये इंग्लंडने ज्या पद्धतीने त्याला खेळवले, त्यामुळे त्यांनी शेवटच्या दोन षटकांवर वर्चस्व गाजवण्याचा आणि स्वतःला शक्य तितक्या संधी देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हीच रणनीती वापरली,” असे तो म्हणाला. बुमराह जी संधि, जो चान्स गमवेल, त्या प्रत्येक संधीचा न्यूझीलंडला फायदा उठवावा लागेल, असंही त्याने सांगितलं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य