टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

४०० वर्षांपूर्वी रायगड कसा दिसत होता? AI नं जिवंत केला इतिहास, पाहा व्हिडीओ

Follow Us:

AI Video: शिवजयंती निमित्त पाहूया रायगडाचा वैभवशाली काळ, ४०० वर्षांपूर्वी रायगड कसा दिसायचा? हे तुम्ही या AI व्हिडीओमध्ये पाहू शकता. हा व्हिडीओ इतका सुंदर आहे की, तुम्हाला जणू त्या काळात गेल्याचाच भास होईल.

New Project (4)
महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. १९ फेब्रुवारी हा दिवस देशभरात मोठ्या उत्साहाने शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी ठिकठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्याख्यानांच्या माध्यमातून महाराजांचे कर्तृत्व सांगितले जाते.असो, पण शिवाजी महाराज म्हणताच आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम उभा राहतो तो रायगड किल्ला. रायगड ही स्वराज्याची राजधानी होती. त्यामुळे आजही हा किल्ला पाहताच डोळ्यांसमोर महाराजांचा काळ उभा राहतो. पण विचार करा, ४०० वर्षांपूर्वी त्या किल्ल्याची काय शान असेल? त्या किल्ल्यावर लोकांची वर्दळ कशी असेल? मराठी माणसं त्या किल्ल्यावर कशी राहत असतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हायरल व्हिडीओमध्ये मिळू शकतात. हा व्हिडीओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. तरी देखील हा व्हिडीओ पाहताना तुम्ही ४०० वर्षे जुन्या काळात हरवून जाल.
(फोटो सौजन्य – ai_kunal/Instagram)

कसा दिसत असेल रायगड?

हा व्हिडीओ ai_kunal या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही AI टेक्नोलॉजीच्या मदतीनं तयार करण्यात आलेला रायगड किल्ला पाहू शकता. या किल्यावर लोकांची रेलचेल पाहायला मिळतेय. मोठमोठे वाडे दिसत आहेत. जगदिश्वराच्या मंदिरात पूजा सुरू आहे. मावळे डोळ्यांत तेल घालून तटबंदीचं रक्षण करत आहेत. तलावांमध्ये घोडे पाणी पित आहेत. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हाला सुद्धा टाईममशिनमध्ये बसून महाराजांच्या काळात गेल्यासारखं वाटेल. हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख ८७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शिवाय अनेकांनी या व्हिडीओचं कौतुक केलं आहे.

हा व्हिडीओ सुद्धा पाहा

रायगड हा इतिहासातील भव्यदिव्य असा किल्ला आहे. या किल्ल्याची निर्मिती १२ व्या शतकात चंद्रराव मोरे यांच्या काळात झाली होती, असे म्हटले जाते. त्यावेळी या किल्ल्याचे नाव रायरी होते. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्याची दुरुस्ती करून त्याला स्वराज्याची राजधानी बनवली. याच किल्ल्यावर पुढे महाराजांचा राजाभिषेक झाला. हा किल्ला समुद्रसपाटीपासून तब्बल २७०० फूट उंचीवर आहे. यावरून लक्षात येते की महाराजांनी राजधानी म्हणून रायगडाची निवड का केली. आजही हा किल्ला पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now