टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Mahashivratri 2026: राज्यात महाशिवरात्रीचा जल्लोष, ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

Follow Us:

महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांसह सर्व शिवमंदिरांत भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि बाबुलनाथ मंदिरातील दर्शनासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे.

Mahashivratri 2026: राज्यात महाशिवरात्रीचा जल्लोष, ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी, तुमच्या शहरातील मंदिरात काय स्थिती?

‘बम बम भोले, ओम नमः शिवाय, हर हर महादेव’ असा अखंड जयघोष करत आज महाशिवरात्री निमित्त संपूर्ण महाराष्ट्र शिवभक्तीत तल्लीन झाला आहे. राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांसह सर्वच लहान-मोठ्या शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भाविकांनी मध्यरात्रीपासूनच मंदिरांबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहे. महाशिवरात्रीनिमित्त सर्वच मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने सजवण्यात आले आहे.

बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. परराज्यातूनही भाविक दर्शनासाठी दाखल झाले असून मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. तर परळी येथे महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथाची अलंकारिक महापूजा करण्यात आली. दागदागिन्यांनी मढवलेले देवाचे रूप पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. आज सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक आले आहेत. सध्या संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

भीमाशंकर मंदिर यंदा बंद

भीमाशंकर येथे विकास आराखड्यांतर्गत दुरुस्ती आणि सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने यंदा मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. तरीही महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय महापूजा पार पडली. श्रावण महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. भीमाशंकर मंदिर बंद असल्याने पिंपरी-चिंचवडमधील भाविकांनी स्थानिक मंदिरांत गर्दी केली आहे. विशेषतः पिंपळे सौदागरमधील पेशवेकालीन मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळाली.

मुंबई आणि उपनगरांत शिवभक्तांचा उत्साह

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक बाबुलनाथ मंदिरात मध्यरात्रीपासूनच २ ते ३ किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सोय केली असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. तर दुसरीकडे ९६६ वर्ष जुन्या असलेल्या अंबरनाथच्या मंदिरात दर्शनासाठी बनारसवरूनही भाविक दाखल झाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव यंदा भाविकांना गाभाऱ्याबाहेरूनच दर्शन दिले जात आहे.

बीडमधील सरोवराच्या मध्यभागी असलेल्या १२ व्या शतकातील प्राचीन हेमाडपंती कनकालेश्वर मंदिरात पहाटे महापूजा पार पडली. आकर्षक विद्युत रोषणाईने हे मंदिर उजळून निघाले आहे. तर पुण्यातील मुठा नदीकाठी असलेल्या ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिरात शंखनाद आणि फुलांच्या सजावटीने भक्तांचे स्वागत होत आहे. पहाटेपासूनच येथे दर्शनासाठी गर्दी आहे. माजलगाव येथे तहसीलदारांच्या हस्ते सपत्नीक महापूजा पार पडली. यामुळे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली

Loksabha : लोकसभेतील खासदार 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर

तिला व्हायचं होतं पोलीस, पण फक्त 2 मार्क…20 वर्षीय तरुणीने उचचलं टोकाचं पाऊल; महाराष्ट्रात हळहळ!

रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे

Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या… हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस

महाराष्ट्रात हादरा! भोंदू अशोक खरात प्रकरणात थेट राज्यातील बड्या अधिकाऱ्याचा व्हिडीओ पुढे, मोठी खळबळ, एका..