टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

T20 World Cup 2026 Points Table : टीम इंडियाचा दबदबा! पाकिस्तानची घसरण, सुपर-8 च्या शर्यतीतून 6 संघ जवळपास OUT,

Follow Us:

T20 World Cup 2026 Super 8 Points Table Update : गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी टी-20 वर्ल्डकप 2026 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळाले.

T20 World Cup 2026 Points Table  Update Marathi : गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी टी-20 वर्ल्डकप 2026 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळाले. ग्रुप अ मध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावत पाकिस्तानला मागे टाकले आहे. ग्रुप ब मध्ये श्रीलंका अव्वल स्थानावर आहे, तर ग्रुप सी मध्ये इंग्लंडची घसरण होऊन ते चौथ्या स्थानावर आले आहेत. ग्रुप ‘ड’मध्ये न्यूझीलंडने पहिला क्रमांक कायम राखला आहे. चारही गटांमधून एकूण 6 संघ सुपर 8 च्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत.

सुपर 8 मधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर 6 संघ

ग्रुप स्टेजमध्ये आतापर्यंत 6 संघांनी किमान दोन सामने गमावले आहेत. ग्रुप अ मधून यूएसए आणि नामिबिया, ग्रुप ब मधून आयर्लंड आणि ओमान, ग्रुप क मधून नेपाळ आणि ग्रुप ड मधून अफगाणिस्तान बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. या संघांनी प्रत्येकी दोन सामने गमावले असल्यामुळे त्यांचे सुपर 8 मध्ये पोहोचण्याचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले आहे. कारण दोन विजय आणि दोन पराभव असलेल्या संघांना यावेळी सुपर 8 मध्ये स्थान मिळणे कठीण आहे.

ग्रुप A – पॉइंट्स टेबल

ग्रुप अ मध्ये भारताने दोन सामन्यांत दोन विजय मिळवत 4 गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे. पाकिस्ताननेही दोन सामने जिंकले असले तरी नेट रन रेट भारतापेक्षा कमी असल्याने ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नीदरलँड्स एक विजयासह तिसऱ्या स्थानी आहे. यूएसए आणि नामिबिया यांनी आपले पहिले दोन्ही सामने गमावले आहेत.

संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
भारत 2 2 0 0 4 3.05
पाकिस्तान 2 2 0 0 4 0.932
नेदरलँड्स 2 1 1 0 2 0.356
अमेरिका 2 0 2 0 0 -1.525
नामिबिया 2 0 2 0 0 -2.884

ग्रुप B – पॉइंट्स टेबल

ग्रुप ब मध्ये श्रीलंका दोन विजयांसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने एक सामना खेळून तो जिंकला असून ते दुसऱ्या स्थानी आहेत. झिम्बाब्वेनेही एक सामना जिंकला आहे आणि ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आयर्लंड आणि ओमान यांनी आपले पहिले दोन सामने गमावले असून ते अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
श्रीलंका 2 2 0 0 4 3.125
ऑस्ट्रेलिया 1 1 0 0 2 3.35
झिम्बाब्वे 1 1 0 0 2 2.702
आयरलँड 2 0 2 0 0 -2.175
ओमान 2 0 2 0 0 -4.306

ग्रुप C – पॉइंट्स टेबल

ग्रुप क मध्ये वेस्ट इंडिज दोन विजयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. स्कॉटलंड आणि इटली यांनी प्रत्येकी एक विजय मिळवला असून ते अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. इंग्लंडने दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभव स्वीकारला असून खराब नेट रन रेटमुळे ते चौथ्या स्थानी घसरले आहेत. नेपाळने दोन्ही सामने गमावले असून ते शेवटच्या स्थानी आहेत.

संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
वेस्ट इंडिज 2 2 0 0 4 1625
स्कॉटलंड 2 1 1 0 2 0.95
इटली 2 1 1 0 2 -0.352
इंग्लंड 2 1 1 0 2 -0.65
नेपाळ 2 0 2 0 0 -1.854

ग्रुप D – पॉइंट्स टेबल

ग्रुप ड मध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून 4-4 गुण मिळवले आहेत. मात्र, चांगल्या नेट रन रेटमुळे न्यूझीलंड अव्वल स्थानावर आहे आणि दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आहे. अफगाणिस्तानने दोन्ही सामने गमावले आहेत. यूएई आणि कॅनडा यांनी प्रत्येकी एक सामना खेळून पराभव पत्करला आहे.

संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
न्यूझीलंड 2 2 0 0 4 1.919
दक्षिण आफ्रिका 2 2 0 0 4 1.425
अफगाणिस्तान 2 0 2 0 0 -0.555
UAE 1 0 1 0 0 -2.763
कॅनडा 1 0 1 0 0 -2.85

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य