टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

शरद पवार यांची प्रकृती कशी? मोठी अपडेट समोर

Follow Us:

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. खोकला व श्वसनाचा त्रास असल्याने त्यांना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचारानंतर प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून, पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

Sharad Pawar Health Updates : शरद पवार यांची प्रकृती कशी? कधी मिळणार डिस्चार्ज ? मोठी अपडेट समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेतके शरद पवार (Sharad Pawar) हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शरद पवार बारामतीत असताना त्यांना अस्वस्थ वाटत होतं, त्रास होत होत म्हणून सोमवारी रत्यांना ताडीने पुण्याला हलवण्यात आलं. तेथूल रूबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल करून शरद पवार यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांचं एक पथक सातत्याने त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेऊन होतं. त्यांच्या तब्येतीबद्दल वेळोवेळी माहितीही देण्यात येत होती. दरम्यान आज त्यांच्या प्रकृतीबद्दल नवे अपडेट्स समोर आले आहेत. तसेच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळणार याचीही माहिती समोर आली आहे.

कधी मिळणार डिस्चार्ज ?

सतत येणार खोकला आणि श्वसनास होणारा त्रास यामुळे सोमवारी दुपारी शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर लगेच उपचार सुरू झाले. आता  5 दिवसांच्या उपचारांनंतर शरद पवार यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येऊ शकतं. आज दुपारच्या सुमारास शरद पवार यांना डिस्चार्ज मिळू शकतो, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे आज त्यांना घरी सोडलं जाऊ शकतं. या बातमीमुळे पवार कुटुंबीय आणि शरद पवार यांचे समर्थक, चाहते, पक्षाचे कार्यकर्ते यांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

पंतप्रधानांनीही केला होता फोन

सोमवारी रुग्णालयात दाखल केल्यावरच शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर त्यांना होत असलेला त्रास आता काही प्रमाणात कमी झाल्याचही डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवारांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलनुसार शरद पवारांवर उपचार झाले आणि त्यांच्या तब्येतीवर अतिशय बारकाईने लक्षात ठेवण्यात आलं. वेळोवेळी त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स, त्यासंबंधी माहिती डॉक्टरांकडून जाहीर करण्यात येत होती. त्यांच्या तब्येतीबददल समजल्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन केला होता. मोदींनी मंगळवारी सकळी पवारांना फोन केला, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, अशी माहितीि समोर आली होती.

सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं  ?

शरद पवार यांच्या तब्येतीबाबत त्यांच्या कन्येकडून, सुप्रिया सुळे यांच्याकडूनही अपडेट देण्यात आली होती. ” बाबांना छातीत संसर्ग झाला असून त्यांना 5 दिवसांच्या अँटीबायोटिक्सचा कोर्स (Antibiotics Course) पूर्ण करावा लागणार आहे. सुदैवाने, इतर सर्व शारीरिक रिपोर्ट्स सामान्य आले आहेत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे,” असं ट्विट त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं, तर कालही माध्यमांशी बोलताना त्यांना शरद पवारांच्या प्रकृतीबद्दल विचारल्यावर अँटी बायोटिक्सचा कोर्स सुरू आहे. तो पू्र्ण झाल्यावर घरी सोडण्याबाबत पुढला निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी नमूद केलं होतं.  त्यानुसार, कदाचित आज दुपारी शरद पवार यांना घरी सोडलं जाऊ शकतं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य