टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

T20 World Cup 2026 Points Table: वेस्ट इंडिजने इंग्लंडचा सुपर 8 फेरीचा मार्ग केला कठीण, गुणतालिकेत असे पडले फासे

On: February 12, 2026 10:02 AM
Follow Us:

ICC Men’s T20 World Cup 2026 Match Points Table: दहा वर्षानंतर वेस्ट इंडिजने इंग्लंडला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पराभूत केलं. वेस्ट इंडिजने 30 धावांनी मात केली. यामुळे गट क मधील गुणतालिके मोठा उलटफेर झाला आहे. या पराभवामुळे इंग्लंडला आता पुढचे दोन्ही सामने जिंकणं भाग आहे.

T20 World Cup 2026 Points Table: वेस्ट इंडिजने इंग्लंडचा सुपर 8 फेरीचा मार्ग केला कठीण, गुणतालिकेत असे पडले फासे

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील 15व्या सामन्यात वेस्ट इंडिज आणि इंग्लंड आमनेसामने आले होते. हा सामना क गटातील गुणतालिकेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. आधीच इंग्लंडचा संघ नेट रनरेटच्या बाबतीत अडचणीत होता. त्यामुळे हा सामना जिंकून अव्वल स्थान गाठण्याची संधी होती. पण ही संधी काही इंग्लंडला घेता आली नाही. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दुसऱ्या डावात दव पडेल आणि धावांचा पाठलाग करणं सोपं होईल असा अंदाज त्यांनी बांधला होता. पण हे फासे उलटे पडले. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही इंग्लंडला गाठता आलं नाही. इंग्लंडचा संघ 19 षटकात सर्व गडी गमवून 166 धावांपर्यंत मजल मारू शकला. हा सामना इंग्लंडने 30 धावांनी गमावला. त्यामुळे गुणतालिकेत इंग्लंडला मोठा फटका बसला आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिजने आतापर्यंत खेळलेल्या दोन पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजचा संघ क गटात अव्वल स्थानी कायम आहे. वेस्ट इंडिजचे 4 गुण आणि +1.625 नेट रनरेट आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजला दोन सोपे पेपर आहेत. नेपाळ आणि इटलीचा सामना करायचा आहे. तसं पाहिलं तर नेपाळ या स्पर्धेत उलटफेर करण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे काही सांगता येत नाही. स्कॉटलँडचा संघ दुसऱ्या स्थानावर असून दोन पैकी एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. स्कॉटलँडचे 2 गुण असून नेट रनरेट हा +0.950 आहे.

क गटात इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानावर कायम आहे. सुपर 8 फेरीत स्थान मिळवण्यासाठी गटात अव्वल दोन स्थानी असणं आवश्यक आहे. त्यामुळे इंग्लंडला आता पुढच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा सुपर 8 फेरीचा प्रवास सोपा झाला आहे. दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला की स्थान पक्कं होईल. कारण वेस्ट इंडिजचा नेट रनरेट हा चांगला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now