टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ajit Pawar : अजित पवार यांच्या निधनाला 15 दिवस, जय पवार यांनी सोशल मीडियावर पुन्हा…

Follow Us:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला 15 दिवस पूर्ण झाले आहेत. 28 जानेवारीच्या विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाले होते, ज्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजित दादांच्या आठवणीत त्यांचे चिरंजीव जय पवार सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आहेत. ‘Miss You Dad’ म्हणत त्यांनी वडिलांच्या संस्कारांना उजाळा दिला, ज्यामुळे अनेकांना गहिवरून आले आहे.

Ajit Pawar : अजित पवार यांच्या निधनाला 15 दिवस, जय पवार यांनी सोशल मीडियावर पुन्हा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाला आज 15 दिवस पूर्ण झाले आहेत. 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सभा घेण्यासाठी अजित पवार हे मुंबईहून बारामतीला जात होते. सकाळी 8 च्या सुमारास त्यांचे विमान निघालं आणि 8.45 च्या सुमारास विमान बारामती एअरपोर्टजवळ आल्यावर अचानक क्रॅश झालं आणि मोठ्ठा स्फोट झाला. यामध्ये अजित पवर यांच्यासह आणखी चौघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, पायलट सुमित कपूर, को-पायलट पाठक आणि फ्लाइट अटेंडंड पिंकी माली यांचा समावेश होता.

अजित पवारांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला. संपूर्ण बारामती आणि अख्ख राज्य सुन्न झालं. पवार कुटंब, सुनेत्रा पवार आणि पार्थ-जय पवार यांच्या अश्रूंना खळ नव्हता. दुसऱ्या दिवशी बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज त्यांच्या निधनाला 2 आठवडे, 15 दिवस पूर्ण झाले आहेत.

वडिलांच्या आठवणीने जय पवार भावूक

त्यांच्या जाण्याने कुटुंब प्रचंड शोकाकुल असून त्यांचा मुलाग जय पवार हा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वडिलांच्या आठवणी पोस्ट करताना दिसत आहे. आज अजित दादांना जाऊन 15 दिवस उलटल्यावर, आजही जय पवार याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. वडिलांच्या आठवणीत तो खूप भावूक झालेला दिसला.

जय याने अजित पवार यांचा हसरा फोटो पोस्ट केला असून त्यासोबत काही ओळीही लिहील्या आहेत. ‘ तुमची रोज आठवण येते. तुम्ही दिलेले संस्कार आणि शिकवण माझ्या प्रत्येक पावलात आहेत – ते कधीही कमी पडू देणार नाही. Miss You Dad’ असं लिहीत जय पवार याने वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

यापूर्वीही जय याने अजित पवारांसोबतचे काही फोटो पोस्ट केले होते. गेल्या आठवड्यात, 3 फेब्रुवारीला त्याने अजित पवारांसोबतचे काही खास फोटो शेअर केले होते. Missing you a lot Dad अशी छोटीशी कॅप्शन त्यांनी यासोबत लिहीली आहे. तर पुढच्या फोटोमध्ये जय यांनी अजित पवार यांना घट्ट मिठी मारल्याचे आणि अजित पवार हे हसतमुखाने उभे असल्याचे दिसत होतं. ” Dad, काश वेळ थांबली असती… मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. ” असं त्यांनी या फोटोसोबत लिहीलं होतं. तर त्यानंतरही त्यांनी वडिलांच्या काही आठवणी फोटोच्या रुपात शेअर केल्या होत्या. आज पुन्हा जय पवार हे वडिलांच्या आठवणीत भावूक झाल्याचे दिसले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now