टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

UPSC CSE 2026: यूपीएससीकडून नागरी सेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध, किती पदांसाठी परीक्षा,अर्ज कधीपर्यंत करता येणार?

Follow Us:

UPSC CSE 2026 : नागरी सेवा परीक्षेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगानं (UPSC) नागरी सेवा परीक्षा (Civil Services Exam) 2026 चं नोटिफिकेशन जारी केलं आहे.  देशभरातून या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. देशातील लाखो तरुण आणि तरुणी आयएएस, आयपीएस आणि आयएफएस सेवेत नोकरीची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एक संधी उपलब्ध झाली आहे. यूपीएससीकडून जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार 933 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

UPSC कडून जाहिरात प्रसिद्ध

यूपीएससीकडून नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करुन घेण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 4  फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 24 फेब्रुवारी 2026 आहे. 24 फेब्रुवारीला सायंकळी 6 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येऊ शकतात.  ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे. ते upsc.gov.in  या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. आयोगाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी अटी, अर्ज, वयोमर्यादा आणि इतर गोष्टींसंदर्भातील नियम जाणून घेणं आवश्यक आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नोटिफिकेशननुसार 933 पैकी 33 पद दिव्यांगांसाठी राखीव आहेत.  यासंदर्भातील अधिक माहिती यूपीएससीच्या जाहिरातीत उपलब्ध आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माहितीनुसार पदांच्या संख्येत बदलाची शक्यता आहे. यामध्ये पुढील काळात दुरुस्ती म्हणजे वाढ होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी पदवीधर असणं आवश्यक आहे. पदवीचं शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण झालेलं असाव. उमेदवाराचं वय 1 ऑगस्ट 2026 ला किमान 21 वर्ष आणि कमाल 32 वर्ष असावं. आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत नियमानुसार सूट दिली जाईल.

यूपीएससीनं विद्यार्थ्यांना केलेल्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज भरुन घ्यावेत. नागरी सेवा परीक्षा देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठिण परीक्षा मानली जाते. योग्य रणनिती, नियोजनबद्ध तयारी याद्वारे यश मिळू शकतं.

अर्ज कसा करायचा?

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या https://upsconline.nic.in/  वेबसाईटला भेट द्या. तिथं Create अकाऊंट असा पर्याय असेल. ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक नोंदवून नोंदणी करा, त्यानंतर लॉगीन करुन अर्ज सादर करा.

महाराष्ट्रात, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर,पुणे या केंद्रांवर पूर्व परीक्षा होणार आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही चांगली संधी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now