पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर गॅसचा टँकर पलटी; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचा संतप्त

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Pune Mumbai Expressway: मध्यरात्री धोका टळल्यानंतर टँकर तिसऱ्या लेनवर घेण्यात आला आणि एका लेनवरून मुंबईकडे वाहतूक मार्गस्थ केली गेली. मात्र वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे.

Pune Mumbai Expressway

1/9
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मध्यरात्रीपासून एका लेन वरुन वाहतूक सुरु करण्यात आली आहे. प्रोपोलिन गॅसचा टँकर पलटी झाल्यानं मुंबईकडे जाणारी वाहतूक साधारण आठ तास ठप्प होती.

2/9
मध्यरात्री धोका टळल्यानंतर टँकर तिसऱ्या लेनवर घेण्यात आला आणि एका लेनवरून मुंबईकडे वाहतूक मार्गस्थ केली गेली. मात्र वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे.

3/9
पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ गेल्या सुमारे १५ तासांपासून टँकर पलटी झाल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

4/9
टँकरमधून होणारी गॅस गळती अद्याप थांबलेली नसल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्ग दोन्ही बाजूंनी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.

5/9
परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून हजारो वाहनचालक अडकून पडले आहेत.

6/9
कोणी पहाटे चार वाजल्यापासून, तर कोणी रात्री तीन किंवा पाच वाजल्यापासून या ठिकाणी अडकले असून अनेकांची फ्लाइट चुकली आहे.

7/9
काही कॅन्सरग्रस्त रुग्णही वाहतुकीत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. पाणी, अन्न व शौचालयांची सुविधाही अपुरी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

8/9
दरम्यान, “टोल वसूल केला जातो, पण आपत्कालीन परिस्थितीत महामार्ग इतका वेळ बंद का राहतो?” असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

9/9
प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून महामार्ग मोकळा करावा, अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon